नांदेड(प्रतिनिधी)-एका 13 वर्षीय बालिकेला गर्भवती करणाऱ्या 20 वर्षीय युवकाला पकडल्यानंतर नांदेड जिल्ह्यातील अतिरिक्त तर्द्थ न्यायाधीश आर.एम.पांडे यांनी तीन दिवस अर्थात 29 सप्टेंबर 2024 पर्यंत पोलीस कोठडीत पाठविले आहे.
विमानतळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या एका व्यक्तीने दिलेल्या तक्रारीनुसार आमचे कुटूंब येथेच राहते आणि मोलमजुरी करून जगते. दि.24 सप्टेंबर 2024 रोजी त्यांच्या पत्नीचे उष्णतेमुळे तोेंड आले आहे. म्हणून त्यांना दवाखान्यात घेवून जातांना 13 वर्षाच्या मुलीचे सुध्दा पोट दुखत आहे. म्हणून आम्ही तिला दवाखान्यात नेले. डॉक्टरांनी ती 3 महिन्याची गरोदर असल्याचे सांगितले. याबद्दल मुलीकडून माहिती घेतली असता तिने सांगितले की, करण मारोती पवार हा घरी कोणी नसतांना घरात येत असे आणि माझ्यासोबत गैरवर्तन करत असे. त्याच्यामुळेच मी गरोदर झाले आहे. सध्या त्या बालिकेवर उपचार सुरू आहेत. विमानतळ पोलीसांनी या तक्रारीनुसार करण मारोती पवार (20) विरुध्द गुन्हा क्रमांक 397/2024 दाखल केला. या गुन्ह्यात भारतीय न्याय संहितेची कलमे 64(5)64(2)(एफ) (एम), 65(1) आणि पोक्सो कायद्याचे कलम 4 आणि 8 जोडलेले आहे. या गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरिक्षक विनोद साने यांच्याकडे देण्यात आला.
पोलीस विभागाने त्वरीतच करण मारोती पवारला अटक केली आणि आज न्यायालयात हजर केले. न्यायालयात सहाय्यक सरकारी वकील ऍड.एम.ए.बत्तुल्ला (डांगे) यांनी पोलीस कोठडीच्या आवश्यकतेचे सादरीकरण करतांना सशक्तपणे मांडलेली बाजू ग्राह्य मानुन न्यायाधीश आर.एम. पांडे यांनी करण मारोती पवारला तिन दिवस अर्थात 29 सप्टेंबर 2024 पर्यंत पोलीस कोठडीत पाठविले आहे.