माळटेकडी रेल्वे रुळांवर अनोळखी युवकाचे प्रेत सापडले

नांदेड(प्रतिनिधी)-माळटेकडी रेल्वे स्थानकाच्या फ्लाट क्रमांक 2 वर एका अनोळखी युवकाची मानेपासून डोके वेगळे झालेले प्रेत सापडले आहे. अद्याप या युवकाची ओळख पटलेली नाही.
आज सकाळी 11 वाजेच्यासुमारास माळटेकडी रेल्वे स्थानकाच्या फ्लाट क्रमांक 2 वर एक अनोळखी युवकाचे प्रेत सापडले. युवकाचे मुंडके धडापासून वेगळे झालेले आहे. प्रथमदर्शनी असे वाटते की, या युवकाने रेल्वे रुळांवर आपले मुंडके ठेवून आत्महत्या केली आहे. रेल्वे पोलीस याप्रकरणाचा तपास करीत आहेत. वृत्तलिहिपर्यंत या युवकाची ओळख पटलेली नव्हती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!