नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड जिल्हा पोलीसांनी कत्तीलीसाठी जाणारे 7 बैल पकडून त्यांना जीवनदान दिले आहे. हा प्रकार नांदेड ग्रामीण पोलीस ठाणे आणि देगलूर पोलीसांनी यशस्वी केला आहे.
दि.19 सप्टेंबरच्या सायंकाळी 6 वाजता धनेगाव चौकातून जाणारा एक मालवाहतुक वाहन क्रमांक एम.एच.26 एच.9376 पोलीसांनी तपासला तेंव्हा त्यात गोवंश जातीचे दोन बैल दाटीवाटीने कोंबून कत्तलीसाठी घेवून जात असल्याचे पोलीसांना दिसले. तेंव्हा पोलीस अंमलदार शेख आसीफ शेख अली यांनी दिलेल्या तक्ररीवरुन रहिम मोहम्मद पठाण(42) रा. किवळा ता.लोहा आणि तानाजी दिगंबर कदम रा.पुयडवाडी ता.जि.नांदेड या दोघांविरुध्द गुन्हा क्रमांक 449/2024 दाखल करण्यात आला आहे. दोन बैल 40 हजार रुपयांचे आणि गाडी 1 लाख रुपयांची असा 1 लाख 40 हजांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस निरिक्षक कदम यांच्याकडे देण्यात आला आहे.
देगलूर येथील पोलीस अंमलदार भारत खंडू फताडे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 19 सप्टेंबरच्या सायंकाळी 4 वाजेच्यासुमारास सांगवी ते नरंगल रस्त्यावर साई श्रध्दा बार ऍन्ड रेस्टॉरंट समोर त्यांनी पायी 6 बैल जात असतांना त्याची तपासणी केली असता ते बैल कत्तीसाठी जात असल्याचे त्यांना समजले. या बाबत बैल नेणारा शेख पाशा शेख हैदर(55) रा.देगलूर याच्याविरुध्द गुन्हा क्रमांक 446/2024 दाखल करण्यात आला आहे. या 6 बैलांची किंमत 1 लाख रुपये असल्याचे लिहिले आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस अंमलदार सकनुरे हे करीत आहेत.