नांदेड(प्रतिनिधी)- आज सर्वत्र श्री गणेश विसर्जनाची धामधुम सरू असतांना धनेगाव येथील आयडियल कॉलनीमध्ये घर असणाऱ्या एका पोलीस अंमलदाराने आपल्या पत्नीला शासकीय बंदुकीतून गोळी मारून हत्या केल्याचा प्रकार आज सायंकाळी 6 वाजता घडला आहे.
नांदेड शहरातील विमानतळ पोलीस ठाणे येथे गुन्हे शोध पथकामध्ये अफजल पठाण हे पोलीस अंमलदार कार्यरत आहेत. गुन्हे शोध पथकामध्ये असल्यामुळे त्यांच्याकडे शासकीय बंदुकपण होती. प्राप्त झालेल्या माहितीनुसार आज सर्व पोलीस पुर्णपणे व्यस्त असतांना अफजल पठाण आपल्या घरी गेले आणि आपल्या पत्नीला आपल्या शासकीय बंदुकीतून गोळी मारून ठार केले आहे. प्राप्त झालेल्या खात्रीलायक माहितीनुसार पत्नीचा खून करतांना अफजल पठाण पुर्णपणे मद्याच्या प्रभावात होते असे सांगण्यात आले.
घटनेची माहिती मिळताच नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यातील गुन्हे शोध पथकाचे प्रमुख पोलीस उपनिरिक्षक महेश कोरे आणि त्यांचे सहकारी पोलीस अंमलदार े आयडीयल कॉलनीमध्ये गेले आणि अफजल पठाणच्या घरी घडलेला प्रकार पाहिला. त्यानुसार पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे. सध्या पोलीस अंमलदार अफजल पठाण नांदेड ग्रामीण पोलीसांच्या ताब्यात असल्याचे समजते.
One thought on “पोलीस अंमलदार अफजल पठाणने पत्नीचा गोळीमारून खून केला”