नांदेड,(प्रतिनिधी)- संविधान महोत्सवाचे औचित्य साधून “संविधान मंदीर” उद्घाटन मा. उपराष्ट्रपती महोदय जगदीप धनखड यांच्या शुभहस्ते रविवार 15 सप्टेंबर 2024 रोजी सकाळी 11 वाजता ऑनलाईन पद्धतीने करण्याचे विभागामार्फत सुनिश्चित केले आहे.
सामाजिक न्यायाची खरी शिकवण ही भारताच्या संविधानातून प्राप्त होत असल्यामुळे कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागांतर्गत व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाच्या अधिपत्याखालील सर्व शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थामध्ये प्रशिक्षण घेत असलेल्या प्रशिक्षणार्थीना सामाजिक न्यायाची खरी शिकवण मिळावी यासाठी कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाचे मंत्री मंगलप्रभातजी लोढा यांच्या संकल्पनेतून राज्यातील 434 शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थामध्ये संविधान मंदिराची स्थापना करण्यात आलेली आहे.
त्याअनुषंगाने प्रस्तुत संस्थेत संविधान महोत्सवाचे औचित्य साधून 12 ते 15 सप्टेंबर 2024 पर्यंत नाविन्यपुर्ण उपक्रम राबवून संविधानावर आधारित विविध कार्यक्रमाचे आयोजन शिल्प निदेशक तथा प्रशिक्षणार्थ्यांसाठी करण्यात येणार आहे. तसेच दिनांक 15 सप्टेंबर रोजी औद्योगिक प्रशिक्षण संस्था नांदेड येथे साळी 11 वा. संविधान मंदिराचे उद्घाटन आभासी पद्धतीने करण्यात येणार आहे. उद्घाटन सोहळ्यासाठी जिल्ह्याचे पालकमंत्री, मा. मंत्री, मा. आमदार विधानसभा व विधानपरिषद, जिल्हयातील सर्व मान्यवर प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत, असे नांदेड औद्यागिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य यांनी कळविले आहे.