“संतोष’ मध्ये पसरलेला पत्रकारांचा “असंतोष’ आता सार्वजनिक

नांदेड(प्रतिनिधी)-आशिष विद्यार्थी, महिला पत्रकार रुडी आणि छायाचित्रकार केवीन कार्टर यांना आता विसरण्याची वेळ आली आहे. रसेल ऑर्नल्ड हे सांगत होते की, सत्ताधाऱ्यांच्याविरुध्द छापणेच खरी पत्रकारीता आहे. इतर फक्त संबंध छान राहण्यासाठी लिहिणे आहे. नांदेडमधील पत्रकारांचा रुकम्या डाकू आता गुपचूप एका नेत्याच्या हाताखाली काम करत आहे. त्यामुळे त्याला सार्वजनिकरित्या बोलता येत नाही. पण त्याची जागा घेण्यासाठी सुरू झालेल्या धडपडीतून काल रात्री “संतोष’ मध्ये घडला पत्रकारांचा “असंतोष’ या असंतोषाने रुकम्याची जागा कोणी घ्यावी हा वाद असल्याची चर्चा ऐकायला मिळाली.
दर्पण, मुकनायक या वर्तमानपत्रांची सुरूवात झाली तेंव्हा इंग्रजांविरुध्द भारतीय जनतेला जागृत करण्यासाठी त्याचा वापर केला जात असे. दर्पण बाळशास्त्री जांभेकरांनी सुरू केले. ते दोन भाषेत छापले जात होते. कारण इंग्रजी इंग्रजांना कळण्यासाठी आवश्यक होती आणि मराठी भारतीयांना कळण्यासाठी आवश्यक होती. महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी मुकनायक सुरू केले. मुकनायक या शब्दाच्या अर्थातच काही न बोलता सर्व बोलायचे आहे. त्या शिवाय जगाच्या पत्रकारीतेचा ईतिहास पाहिला तेंव्हा ऍडॉल्फ हिटलर, मुसोलिनी, सद्दाम हुसेन अशा अनेक हुकमशाह असलेल्या राजवटींमध्ये सुध्दा आपल्या शब्दातून सत्य मांडणारे पत्रकार जिवंत होते. काळानुरुप प्रत्येक वस्तुमध्ये बदल होत असतो. कधी हाताने लिहिले जाणारे वृत्तपत्र आज संगणक युगात सहज झाले आहे. पुढे त्यात कॅमेरे आले आणि त्यानंतर तर पत्रकारीतेत मोठी क्रांती झाली. या क्रांतीचा उपयोग रुकम्या डाकू सारख्यांनी चुकीचाच केला. काही जणांनी पत्रकार परिषद संपल्यानंतर माईक जमा करण्यासाठी लागणारा वेळ आणि त्यात झालेली बातचित सुध्दा बातमी केली आणि त्या बातमीमुळे मोठा हल्लकोळ माजला. पण आता हे सर्व विसरण्याची वेळ आली आहे.
वर्तमानपत्रातून कमाई करण्याचा चंग बांधलेले अनेक जण आले.त्यांनी विश्वासपुर्वक बोललेल्या शब्दांना सुध्दा बातम्या केल्या. त्यामुळे आज त्या बातमी करणाऱ्यांची परिस्थिती सुध्दा अत्यंत वाईट आहे. पुढे वृत्तवाहिन्या आल्या. त्यानंतर युटूब चॅनल आले. वृत्तवाहिन्यांमध्ये नंबर 1 चे अँकर, विश्लेषक असलेल्या अनेक पैलवानांनी वृत्तवाहिन्या सोडल्या आणि आपल्या युटूब चॅनलच्या माध्यमाने आपले शब्द व्हिडीओच्या माध्यमातून जनतेच्या पुढे आणले. अशा परिस्थितीत युटूबला सुध्दा वृत्तवाहिन्यांएवढेच महत्व आहे.
आता या सर्व स्पर्धेमध्ये कमाईचा प्रश्न आलाच. त्याची गरजही आहे. कारण भाकरी खाण्यासाठी पैसे लागतातच. पण पैसे किती हवेत याला काही मर्यादा राहिली नाही. हॉटेलमध्ये जाऊन 1200 रुपये बिल झाल्यावर 700 रुपये घे कारण आम्ही पत्रकार आहोत असे म्हणणारे महाभाग सुध्दा तयार झाले आणि त्यामुळे पत्रकारांच्या किंमतीमध्ये सतत घसरण होत गेली. ज्यांनी आपल्या लेखणीमध्ये दम ठेवला त्यांची किंमत आजही जग करतेच हेही तेव्हढेच खरे आहे.
हा सर्व एवढा ईतिहास लिहिण्यामागे गरज अशी आहे की, काल रात्री “संतोष’ मध्ये पसरलेला पत्रकाराचा “असंतोष’ मांडायचा आहे. कोणीच कोणाचे गुत्ते घेण्याची गरज नाही. आप-आपल्या ताकतीवर सर्वांनी काम करायला हवे. त्यामुळे त्यांना येणारे उत्पन्न हे त्यांच्या हिंमतीवर येईल. पण त्यात कोणी रोडा टाकला तर भांडणाचे मुळ उत्पन्न होईल आणि असेच काल झाले. तालुक्याच्या युटूबर पत्रकारांना बोलावण्याची गरज आहे. परंतू जिल्ह्याच्या युटूबर पत्रकारांना अमुक ऐवढेच पैसे द्या असे म्हणणारा एक नवीन रुकम्या डाकू तयार झाला. त्याने लावलेली वेगवेगळी फिल्डींग इतरांना कळली आणि त्यातून रोष तयार झाला. कोणी-कोणाला काय द्यावे आणि कोणी कोणाकडून काय घ्यावे हा व्यक्तीगत प्रश्न आहे. “संतोष’ च्या बाहेर रुकम्या डाकूची जागा घेणाऱ्याने मोठा जमाव जमवला होता. पण पुढे जमाव पांगला. त्यामुळे घडलेला “असंतोष’ बराच होता असे म्हणण्याची वेळ आली आहे. आमच्या या शब्दसंघटनेने जुना रुकम्या डाकू खुश होणार आहे.प्रश्न हा आहे की ही बाब कालनंतर आज सार्वजनिक झाली आहे. आमच्या तर्फे मांडण्यात आलेल्या मुद्यांमध्ये सर्वात दु:खदायी बाब तीच आहे की, आपसात झालेले भांडण सार्वजनिक झाले आहे. याचे जबाबदार दोन्ही आहेत. कोणत्याही विरोधासाठी “असंतोष’ माजविण्यापेक्षा शब्दांनी सुध्दा, विचारांनी सुध्दा, देवाण-घेवाणीने सुध्दा हा “असंतोष’ मिटविता आला असता असो.
आशिष विद्यार्थीने दोन विरुध्द जातीच्या जमावासमोर उभे राहुन तुम्ही मला मारले तरच आपसात भांडा असे सांगितले होते. त्यावेळी दोन्ही जमावाने मिळून त्या पत्रकार आशिष विद्यार्थीवर 35 वार केले होते. रुढी या महिला पत्रकाराने चिनमध्ये घडलेला प्रकार व्हिडीओमध्ये रेकॉर्ड करून त्या व्हिडीओची रिल ज्या ठिकाणी लपवून आणली होती ते लिहिण्याची आज आमची हिम्मत नाही. पण तीने ती बातमी बॅंकाकमध्ये जाऊन प्रसिध्द केली होती आणि त्यामुळे चिनचे आंदोलन यशस्वी झाले होते. केवीन कार्टरला नोबेल पुरस्कार मिळाल्यानंतर त्याला त्याच दिवशी गिधाड म्हणणाऱ्या व्यक्तीचे बोलणे ऐकल्यानंतर केवीनने आत्महत्या केली होती. अशा पत्रकारीतेला आता विसरण्याची वेळ आली आहे.50 च्या दशकात होवून गेलेले सआदत हसन मंटो यांनी तर विकलेल्या पत्रकारापेक्षा वेशा बरी असा उल्लेख केलेला आहे. आशा करूया की, आमच्या या शब्दानंतर कोणीच पत्रकार आपसात भांडणार नाहीत आणि भांडलेच तर ते सार्वजनिक होणार नाही याची दक्षता घ्या. तरच खऱ्या अर्थाने लोकशाहीमधील चौथा स्तंभ म्हणून पत्रकारीता टिकेल नाही तर पुढच्या काही दिवसांमध्ये पत्रकार असे नाव घेतल्यावर जनताच आम्हाला मारेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!