नांदेड (प्रतिनिधी)-एका विवाहितेला 25 लाखाचा हुंडा मागणाऱ्या तिच्या सासरच्या मंडळीला 5 लाख रुपये दिल्यानंतर सुध्दा आणखी 2 लाख रुपये आण म्हणून तिला त्रास देणाऱ्या 9 जणांविरुध्द मनाठा पोलीसांनी गुन्हा दाखल केला आहे.
सोलापूर जिल्ह्यात सासुरवाडी असलेल्या आणि सध्या नांदेड येथे माहेरी राहणाऱ्या एका 30 वर्षीय महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार सन 2017 मध्ये तिचे लग्न झाले. तेंव्हापासूनच नवीन फॅक्टरी टाकण्यासाठी माहेरहुन 25 लाख रुपये आण म्हणून तिला त्रास दिला जात होता. तेंव्हा त्या युवतीच्या वडीलांनी 5 लाख रुपये दिलेच होते. 5 लाख रुपये दिल्यावर आणखी 2 लाख रुपये घेवून ये म्हणून त्या महिलेला त्रास देणाऱ्या मारोती बाळू धुने, संतोष बाळू धुने, छायाबाई संतोष धुने, गंगाबाई बाळू धुने, बाळासाहेब सुखदेव व्हरगर, अनिल ज्ञानेश्र्वर चौगुले, नंदाबाई उर्फ आभी सुखदेव व्हरगर, कांताबाई ज्ञानेश्र्वर चौगुले आणि वंदना आयप्पा लकडे अशा 9 जणांविरुध्द मनाठा पोलीसांनी भारतीय न्याय संहितेच्या कलम 85, 115(2), 352, 3(5) नुसार गुन्हा क्रमांक 153/2024 दाखल केला आहे. मनाठा येथील सहाय्यक पोलीस निरिक्षक उमाकांत पुणे यांच्या मार्गद्शनात पोलीस अंमलदार वडजे अधिक तपास करीत आहेत.