नांदेड(प्रतिनिधी)-ऑनलाईन पध्दतीने 5 दुरध्वनी क्रमांकावर एका महिलेने 13 लाख 94 हजार 780 रुपयांचा आर्थिक व्यवहार केल्यानंतर आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले. आता 5 मोबाईल धारकांविरुध्द विमानतळ पोलीसांनी गुन्हा दाखल केला आहे.
18 ऑगस्ट 2024 ते 22 ऑगस्ट 2024 दरम्यान या चार दिवसात नांदेडच्या सांगवी भागात राहणाऱ्या सांची भुपेंद्र राऊत(27) यांनी मोबाईल क्रमांक 8982815318, 8827453811, 7872567501 , 8076951035 आणि 8827465063 या दुरध्वनी क्रमांकांसोबत सांची राऊत यांनी वेगवेगळ्या वेळेस घरी बसून पैसे कमावण्याच्या आमिषाला बळी पडून 13 लाख 94 हजार 780 रुपये हस्तांतरीत केले. यानंतर सुध्दा अजून 8 लाख रुपये दिले तर तुमचे पैसे परत मिळतील असा संदेश मिळाला. पण माझी फसवणूक झाल्याचे माझ्या लक्षात आले होते. त्यानंतर माझे पती आणि आई-वडीलांना सांगून विचारविनमय करून सांची राऊत यांनी 9 सप्टेंबर 2024 रोजी तक्रार दिली आहे. या संदर्भाने विमानतळ पोलीसांनी गुन्हा क्रमांक 368/2024 5 मोबाईल धारकांविरुध्द दाखल केला आहे. या गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरिक्षक विनोद साने करीत आहेत.