आंबाडी-पिंपळढव जंगलात जळालेल्या अवस्थेत सापडलेल्या व्यक्तीची ओळख पटली

नांदेड(प्रतिनिधी)-श्री गणेश स्थापनेच्या दिवशी आंबाडी, पिंपळढव शिवारातील जंगलात जळालेल्या अवस्थेत सापडलेल्या अनोळखी प्रेताची ओळख पटली असून तो व्यक्ती तेलंगणा राज्यातील पिंपळखुंटी ता.भिमपुर जि.आदिलाबाद येथील रहिवासी आहे. त्याचा जाळून खून कोणी केला याचा शोध नांदेड पोलीस घेत आहेत.
7 सप्टेेंबर रोजी सुर्योदय होताच पिंपळढव, आंबाडीच्या जंगलात एक जळालेल्या अवस्थेतील प्रेत सापडले. घटनेची माहिती मिळताच पोलीसांसह नागरीकांनी तेथे गर्दी केली. त्या जळालेल्या प्रेतावर त्याने परिधान केलेली लुंगी तो व्यक्ती तेलंगणा राज्यातील आहे असे सांगत होती. या आधारावर पोलीसांनी आपला तपास सुरू केला आणि त्याचे नाव नारायण जानाकोंडा (38) रा.पिंपळखुंटी ता.भिमपुर जि.आदिलाबाद असल्याचे समजले. या नारायण कोंडाची सासुरवाडी मात्र नांदेड जिल्ह्याच्या किनवट येथे आहे.
नारायण कोंडा हा जंगलात कसा गेला, कोणी त्याला जाळले आणि त्याचे कारण काय? याचा शोध घेण्याचे आव्हान पोलीसांसमक्ष आहे. नांदेड पोलीस दल त्यासाठी कार्यरत आहे. काही महिन्यांपुर्वी माहुर तालुक्यात अशाच एका जळालेल्या अवस्थेत महिलेचे प्रेत सापडले होते. त्या हिलेचे नावच अन माहित झालेल नाही. ते सुध्दा एक मोठे आवाहन नांदेड जिल्हा पोलीसांसमक्ष आहे.
संबंधीत बातमी….

आंबाडी ता.किनवट भागातील पिंपळढव शिवारातील जंगलात सापडले जाळलेले अनोळखी प्रेत

 

One thought on “आंबाडी-पिंपळढव जंगलात जळालेल्या अवस्थेत सापडलेल्या व्यक्तीची ओळख पटली

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!