नांदेड(प्रतिनिधी)-स्थानिक गुन्हा शाखेतील पथकाने 8 सप्टेंबर रोजी देगलूर नाका परिसरातील एका ठिकाणी छापा टाकून 34 हजार 650 रुपयांचा महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधीत केला गुटखा जप्त करून दोघांविरुध्द गुन्हा दाखल केला आहे.
ऑपरेशन फ्लॅश ऑऊट दरम्यान स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरिक्षक उदय खंडेराय यांच्या पथकातील सहाय्यक पोलीस निरिक्षक संकेत दिघे यांना मिळालेल्या माहितीनुसार त्यांनी इतवारा पोलीस कोठ्यातील हद्दीतील एम.के.स्टार डेलिनिड या दुकानाच्या पाठीमागे असलेल्या टीनपत्रांच्या कंपाऊंडमध्ये छापा मारला. तेथे विविध प्रकारचे शासनाने प्रतिबंधीत केलेले गुटख्याचे पुडे सापडले. त्या ठिकाणी हजर असलेले गफार खान आरेफ खान (34), मोहम्मद सुफियान मोहम्मद शब्बीर (22) हे दोघे होते. त्यांच्याकडे सापडलेल्या गुटख्याची किंमत 34 हजार 650 रुपये आहे. पोलीस ठाणे इतवारा येथे गफार खान आणि मोहम्मद सुफियान यांच्याविरुध्द भारतीय न्याय संहितेच्या कलम 123, 223, 274, 275 आणि अन्न सुरक्षा मानके कायद्यामधील अनेक कलमांन्वये गुन्हा क्रमांक 470/2024 दाखल केला आहे. गुटखा कोठून आला होता याचा तपास सुरू आहे.
पोलीस उपमहानिरिक्षक शहाजी उमाप, पोलीस अधिक्षक अबिनाशकुमार, अपर पोलीस अधिक्षक डॉ.खंडेराय धरणे, सुरज गुरव आदींनी ही कार्यवाही करणाऱ्या स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरिक्षक उदय खंडेराय, सहाय्यक पोलीस निरक्षिक संकेत दिघे, पोलीस अंमलदार किशन मुळे, विश्र्वनाथ पवार, गंगाधर घुगे, शेख महेजबिन यांचे कौतुक केले आहे.