नांदेड(प्रतिनिधी)-देगलूर येथे आठवडी बाजारात भाजीपाला खरेदी करण्यासाठी गेलेल्या महिलेच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र महिलेने बळजबरीने चोरून नेले आहे.
चंद्रकांता सायलु कुद्रेलवार या महिला 7 सप्टेंबर रोजी दुपारी 4 वाजेच्यासुमारास देगलूर येथील आठवडी बाजारात भाजीपाला खरेदी करण्यासाठी गेल्या होत्या. गर्दीचा फायदा घेवून एका महिलेने त्यांच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसुत्र किंमत 15 हजार रुपयांचे जबरीने हिसकावून नेले आहे. देगलूर पोलीसांनी ही घटना गुन्हा क्रमांक 423/2024 प्रमाणे दाखल केली आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस अंमलदार पत्रे हे करत आहेत.