राज्यभरात 17 भारतीय पोलीस सेवेतील आणि राज्य पोलीस सेवेतील अधिकाऱ्यांना नवीन नियुक्त्या

नांदेड(प्रतिनिधी)-भारतीय पोलीस सेवेतील आणि राज्य पोलीस सेवेतील 17 पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या राज्य शासनाच्या गृहविभागाने केल्या आहेत. त्यातील काही अधिकाऱ्यांना काहीच दिवसापुर्वी दिलेल्या जागा बदलून दिल्या आहेत. भारतीय पोलीस सेवेतील अधिकाऱ्यांच्या वरिष्ठ समयश्रेणीनुसार पदोन्नत्यापण जाहीर झाल्या आहेत.
बदली झालेल्या भारतीय पोलीस सेवेतील आणि राज्य सेवेतील अधिकाऱ्यांची नावे पुढील प्रमाणे आहेत. त्यात काही जणांना पुर्वी केलेल्या बदल्या बदलून दिल्या आहेत. सुशांत सिंह-समादेशक पोलीस बल गट क्रमांक 18 काटोल नागपूर कॅम्प अमरावती, अभयसिंह बाळासाहेब देशमुख- पोलीस अधिक्षक शस्त्र निरिक्षण शाखा पुणे, गोपालराज जी.- समादेशक राज्य राखीव पोलीस गट क्रमांक 11 नवी मुंबई, आतिश नामदेव कांबळे-अपर पोलीस अधिक्षक नंदुरबार, महक स्वामी-पोलीस उपआयुक्त नागपुर शहर, निथीपुडी रश्मीता राव- पोलीस उपआयुक्त नागपूर शहर, पंकज अतुलकर-समादेशक राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक 10 सोलापूर, सिंगारेड्डी ऋषीकेश रेड्डी- पोलीस अधिक्षक अहेरी, गडचिरोली, संदीपसिंह-पोलीस उपआयुक्त पुणे शहर(पोलीस अधिक्षक पुणे ग्रामीण), पंकज देशमुख-पोलीस अधिक्षक पुणे ग्रामीण(पोलीस उपआयुक्त बृहन्मुंबई), तेजसी सातपुते- पोलीस उपआयुक्त बृहन्मुंबई(पोलीस उपआयुक्त पुणे शहर), राजतिलक रोशन-पोलीस उपआयुक्त परिमंडल-9 बृहन्मुंबई(सहाय्यक पोलीस महानिरिक्षक कायदा व सुव्यवस्था महाराष्ट्र राज्य, मुंबई), निमित्त गोयल-पोलीस उपआयुक्त नागपूर शहर(पोलीस उपआयुक्त बृहन्मुंबई), विजय चव्हाण-समादेशक राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक 10 सोलापूर(प्राचार्य पोलीस प्रशिक्षण केंद्र सोलापूर).
काही दिवसांपुर्वीच झालेल्या बदल्यांचे आदेशात बदल करून लोहित मतानी यांना पोलीस अधिक्षक भंडारा या पदावरून सहाय्यक पोलीस महानिरिक्षक कायदा व सुव्यवस्था या ठिकाणी नियुक्ती दिली होती. ती बदलून नागपूर शहर येथे पोलीस उपआयुक्त पदावर पाठविले आहे.त्याचप्रमाणे सुधाकर पठारे यांना पोलीस उपआयुक्त ठाणे येथून पोलीस अधिक्षक सातारा येथे पाठविले होते. पण ते बदलून पोलीस उपआयुक्त बृहन्मुंबई येथे नियुक्ती दिली आहे. रोहिदास पवार यांना पोलीस उपआयुक्त छत्रपती संभाजीनगर बदलून अपर पोलीस अधिक्षक लोहमार्ग पुणे येथे नियुक्ती दिली आहे. लक्ष्मीकांत पाटील- प्राचार्य पोलीस प्रशिक्षण केंद्र नागपूर यांना पोलीस अधिक्षक सायबर सुरक्षा मुंबई येथे नियुक्ती देण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!