नांदेड(प्रतिनिधी)-भाग्यनगर पोलीसांनी भवानी चौकात एका चार चाकी वाहनामध्ये कोंबून कत्तलीसाठी जाणारे 17 गोवंश जातीचे बैल हे पशुधन जप्त केले आहे. चार जणांविरुध्द या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार पुर्णा ते नांदेडकडे येणाऱ्या चार चाकी वाहन क्रमांक एम.एच.28 बी.बी.4944 ला थांबून त्याची तपासणी केली असता 17 गोवंश जातीचे बैल सापडले. गाडीचा चालक शेख आयुब शेख युसूफ रा.नशीराबाद ता.जि.जळगाव, गाडीचा हेल्पर फरीद नबी कुरेशी रा.वाघारी ता.जामनेर जि.जळगाव, दुसरा हेल्पर शेख मुख्तार शेख अब्बास रा.आयशानगर मालेगाव जि.नाशिक आणि बैल मालक शेख अस्लम शेख फकीरा रा.पाचोरा जि.जळगाव अशा चार जणांना पकडण्यात आले. 17 बैलांची किंमत 5 लाख 85 हजार रुपये, चार चाकी वाहनाची किंमत 17 लाख रुपये असा 22 लाख 85 हजारांचा मुद्देमाल जप्त करून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बैलांना पालन पोषणासाठी गौशाळेत दाखल करण्यात आले आहे.
पोलीस अधिक्षक अबिनाशकुमार, अपर पोलीस अधिक्षक डॉ.खंडेराय धरणे, सुरज गुरव, सहाय्यक पोलीस अधिक्षक किरितिका सीएम यांनी भाग्यनगरचे पोलीस निरिक्षक रामदास शेंडगे, गुन्हे शोध पथकाचे प्रमुख पोलीस उपनिरिक्षक के.बी.केजगिर, पोलीस अंमलदार विशाल माळवे, अदनान पठाण यांचे कौतुक केले आहे.