अंकुर हॉस्पीटलवर गुन्हा दाखल करण्याची मागणी

नांदेड(प्रतिनिधी)-गर्भातील बाळाची योग्य वाढ होत नाही म्हणून गर्भपात करतांना डॉक्टरांच्या चुकीने माझी पत्नी कोमामध्ये गेली, माझे बाळ गेले, पुढील खर्च 31 लाख रुपये लागला या डॉक्टरांवर गुन्हा दाखल करावा असा अर्ज विष्णुपूरी येथील पंकज आळंदी आढव यांनी पोलीस निरिक्षक शिवाजीनगर यांना लिहिला आहे. तसेच इंडियन मेडीकल असोसिएशन नांदेड यांना पण या अर्जाची प्रत दिली आहे. हा सर्व घटनाक्रम अंकुर हॉस्पीटलमध्ये घडला आहे.
पंकज आळंदी आढव यांनी दिलेल्या तक्रारी अर्जानुसार त्यांच्या पत्नी शुभांग पंकज आढाव ह्या दुसऱ्यांदा गर्भवती झाल्या. त्यांना पुर्वीचा 4 वर्ष 5 महिने वयाचा मुलगा आहे. अण्णाभाऊ साठे चौकातील अंकुर हॉस्पीटलमध्ये डॉ.सारीका झुंजारे यांच्याकडे शुभांगी आढाव यांचा उपचार पहिल्या बाळाच्यावेळेस पण झाला होता आणि दुसऱ्या बाळाच्यावेळस पण त्यांच्याकडेच होता.
शुभांगी आढाव यांचा गर्भ दोन महिन्याचा असतांना नोव्हेंबर महिन्यात त्यांची तपासणी सोनोग्रॉफी पध्दतीने झाली. त्यावेळी त्यांना गर्भाची वाढ अयोग्य आहे असे सांगून गर्भपात करावा लागेल असे सुचविण्यात आले. डॉक्टर सारीका झुंजारे यांच्यावर पहिल्या बाळाचा विश्र्वास आढाव पती-पत्नीचा होताच. त्यामुळे ती बाब मान्य केली. त्यानुसार 31 जुलै 2024 रोजी त्यांचा गर्भपात करण्यात आला. गर्भपात झाल्याबरोबर शुभांगी आढाव या कोमात गेल्या परंतू याची विचारणा केली असता तिला थोडेसे इंफेक्शन झाले असल्याचे डॉक्टर सारिका झुंजारे यांनी सांगितले आणि उपचारासाठी दुसरीकडे हलविण्याची सुचना केली. तेंव्हा आम्ही लाईफ केअर हॉस्पीटलमध्ये शुभांगी आढाव यांना नेले पण त्यांच्या वाचण्याची शक्यता कमी आहे असे सांगून लाईफ केअरने सुध्दा आम्हाला रुग्ण दुसरीकडे नेण्यास सांगितले.
यानंतर आम्ही 10 टक्के जीवंत राहण्याची शक्यता असणाऱ्या शुभांगी आढाव यांना हैद्राबाद येथे नेले आणि तेथे अत्यंत खर्चीक असलेल्या पध्दतीद्वारे शुभांगी आढाव यांच्यावर उपचार झाला. त्यासाठी 31 लाख रुपये खर्च आला आणि आता कुठेशी शुभांगी आढाव ह्या आपल्या हाताने जेवण करत आहेत अशी परिस्थिती आहे. या सर्व घटनाक्रमाबद्दल पंकज आढाव हे या प्रकरणात डॉक्टरांचा हलगर्जीपणा आहे असे सांगतात. पंकज आढाव सांगतात की, आम्ही बऱ्याच डॉक्टरांसोबत या संदर्भाने चर्चा केली असतांना ते डॉक्टर सांगत आहे की, इंफेक्शन हे का होते, कसे होते, याला कोणतेही चॅलेंज नाही. जी महिला हसत खेळत गर्भपात करण्यासाठी गेली होती. म्हणजे तिला झालेले इंन्फेक्शन हे शस्त्रक्रियेच्या वेळीच झाले असणार असे पंकज आढावा सांगतात.
या संदर्भाने वास्तव न्युज लाईव्हला माहिती देतांना पंकज आढाव म्हणाले मी या प्रकरणात झालेल्या मानसिक त्रासासाठी, आर्थिक त्रासासाठी, माझ्या कुटूंबात माझ्या चार वर्षाच्या मुलाला झालेल्या शारिरीक त्रासासाठी दिल्लीपर्यंत दाद मागणार आहे. मला उपलब्ध असलेल्या सर्व प्रकारच्या प्रक्रिया मी अंमलात आणणार आहे. डॉक्टरांचा व्यवसाय आता सेवा राहिला न तो आता धंदा झाला आहे.कोणाच्याही घरच्या रुग्णावर उपचार करतांना त्या रुग्णाकडून आपण जास्तीत जास्त पैसे कसे कमवावे यामध्येच नांदेडचे काही डॉक्टर गुंतलेले आहेत असा आरोप पंकज आढाव यांनी केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!