नांदेड – येथील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक तथा शासकीय कंत्राटदार नरेश पैंजणे (५३) यांचे शनिवारी सकाळी तीव्र हृदयविकाराच्या झटक्याने राहत्या घरी निधन झाले. त्यांचा अंत्यविधी रविवार दि.१ सप्टेंवर रोजी सकाळी १० वा. गोवर्धनघाट शांतीधाम स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. तत्पूर्वी त्यांची अंत्ययात्रा त्यांचे राहते घर कस्तुरी निवास, यशवंतनगर विस्तारीत येथून निघणार आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, वडील, तीन भाऊ असा मोठा परिवार आहे. परभणी येथील निवासी उपजिल्हाधिकारी अनुराधा ढालकरी यांचे ते पती होत. नांदेड सार्वजनिक बांधकाम विभागात गेल्या अनेक वर्षांपासून त्यांनी कंत्राटदार म्हणून काम केले आहे.
More Related Articles
भाजप कार्यकर्त्यांमध्ये शब्द बाणांचा मारा
नांदेड(प्रतिनिधी)-भारतीय जनता पार्टीच्या पराभवाची कारण मिमांसा करण्यासाठी आज राज्याचे मंत्री राधाकृष्ण विखे पाटील हे येणार…
बिलानगर येथे घरफोडून 1 लाख 90 हजारांची चोरी; फुलवळ शिवारातील गोडाऊनमध्ये चोरी
नांदेड(प्रतिनिधी)-बिलालनगर येथे बंद घरफोडून चोरट्यांनी 1 लाख 90 हजार 100 रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे.…
फुलशेती व उत्तम शेतीवर कार्यशाळा संपन्न
नांदेड(प्रतिनिधी)- सहकार व पणन विभाग अंतर्गत आशिया विकास बॅंक अर्थसाहित महाराष्ट्र ग्री बिझनेस नेटवर्क( मॅग्नेट…