नांदेड(प्रतिनिधीण)-खा.वसंतराव चव्हाण यांच्या अंत्यविधी कार्यक्रमात असलेल्या गर्दीचा फायदा घेवून 10.8 तोळे सोने चोरट्यांनी लांबवले आहे. ही तक्रार चोरट्यांच्या नावासह दाखल करण्यात आली आहे. एकूण 5 व्यक्तींचा हा ऐवज आहे.
बालाजी धोंडीबा गादेवार यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 27 ऑगस्ट रोजी बैल बाजार नायगाव येथे 11 वाजेच्यासुमारास खा.वसंतराव चव्हाण यांचा अंतिविधी कार्यक्रम सुरू होता. या अंत्यविधीमध्ये झालेली गर्दी पाहुन चोरट्यांनी त्यात बालाजी गादेवार आणि इतर चार व्यक्तींच्या गळ्यातील एकूण 10 तोळे 8 गॅ्रम वजनाचे सोन्याचे चैन चोरले. या ऐवजाची एकूण किंमत 4 लाख 32 हजार रुपये आहे. या तक्रारीमध्ये आरोपी रकान्यात शेख नदीम शेख खाजा (21) रा.गंगानगर टायरबोर्ड इतवारा आणि सुनिल राजू खुडे (20) रा.विजयनगर पाथर्डी जि.अहमदनगर या दोघांची नावे आहेत. नायगाव पोलीसांनी हा गुन्हा भारतीय न्याय संहितेच्या कलम 303(2), 3(5) नुसार गुन्हा क्रमंाक 216 वर नोंदवला आहे. पोलीस उपनिरिक्षक बी.एन.कदम अधिक तपास करीत आहेत.