नांदेड :- महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण मुंबई यांच्या अधिपत्याखाली स्थायी लोक अदालतींची मुंबई, नागपुर, छत्रपती संभाजीनगर व पुणे येथे स्थापना करण्यात आली आहे. तेथे विधी सेवा प्राधिकरण अधिनियम 1987 चे कलम 22-अ मध्ये विषद केलेल्या लोकोपयोगी सेवा जसे विद्युत, पाणी, गॅस इत्यादी संबंधी प्रकरणे तडजोडी करीता ठेवता येतात. या स्थायी लोक अदालतीत मोठया संख्येने प्रकरणे तडजोडीसाठी ठेवावीत. संबंधीतांनी वरील ठिकाणी निर्माण करण्यात आलेल्या स्थायी लोक अदालती समक्ष आपली प्रकरणे ठेवून ती तडजोडीद्वारे मिटवून घेवून लाभ घ्यावा, असे आवाहन प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा अध्यक्ष नांदेड जिल्हा विधी सेवा प्राधिकरण श्रीमती सुरेखा कोसमकर व जिल्हाविधी सेवा प्राधिकरणाच्या सचिव श्रीमती दलजीत कौर जज यांनी केले आहे.
More Related Articles
29 सप्टेंबर रोजी शौय दिनाचे आयोजन
नांदेड,(प्रतिनिधी)- जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, नांदेड येथे 29 सप्टेंबर 2024 रोजी सकाळी 11 वाजता शौर्य…
उपऱ्या एकनाथ पवारांना जिल्ह्यात फिरु देणार नाही-बबन बारसे
नांदेड(प्रतिनिधी)-पक्ष सोडून जाण्याची तयारी विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतरपासून उपऱ्या एकनाथ पवाराने तयारी सुरू केली होती.…
मराठी का बोलत नाही म्हणून मारहाण;समस्त उत्तर भारतीय नागरिकांमध्ये दहशत
नांदेड़,(प्रतिनिधि)-मराठी का बोलता येत नाही या संदर्भाने उत्तर भारतीय समाजातील एका व्यक्तीला 23 जुलै रोजी…
