नांदेड – प्रधानमंत्री पिक विमा योजना खरीप हंगाम 2023-24 मध्ये सहभाग घेतलेल्या ज्या शेतकऱ्यांना पूर्वसूचना देऊन देखील पिक विमा मिळाला नाही. अशा शेतकऱ्यांनी कृषी विभागाने दिलेल्या प्रपत्रात संपूर्ण माहिती भरुन आवश्यक कागदपत्रासह संबंधित तालुका कृषि अधिकारी तथा सदस्य सचिव तालुकास्तरीय तक्रार निवारण समितीच्या कार्यालयात 3 सप्टेंबर 2024 पर्यत दाखल करावा, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी भाऊसाहेब बऱ्हाटे यांनी केले आहे. तसेच प्रपत्र संबंधित तालुका कृषि कार्यालयातून उपलब्ध करुन घ्यावे असेही कळविले आहे.