नांदेड(प्रतिनिधी)-गावातील एका व्यक्तीला 12 वर्षापुर्वी गहाण खरेदी खत करून दिलेली जमीन परत देत नाही म्हणून उमरी येथील ग्रामसेवकाने आपल्या शेतात गळफास लावून आत्महत्या केल्याचा प्रकार घडला आहे. या संदर्भाने अद्याप पोलीस ठाण्यात कोणतीही नोेंद झालेली नाही.
खात्रीलायक सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मौजे उमरी पोस्ट मालेगाव ता.अर्धापूर येथे राहणारे ग्रामसेवक नारायण वैजनाथ पागरे (45) यांनी सन 2012-2013 मध्ये गावातील मुधोळ नावाच्या व्यक्तीला आपल्या शेताची गहाण खरेदीखत करून दिली होती. ती जमीन परत मला द्या अशी मागणी पागरे हे मुधोळकडे करत होते. दोनवर्षापुर्वी मुधळने पागरेला लाथा-बुक्यांनी मारहाण पण केली होती.पण जमीन काही त्यांना परत मिळाली नाही.यामुळेच ग्रामसेवक नारायण वैजनाथ पागरे यांनी आज 24 ऑगस्ट रोजी सकाळी आपल्या शेतातील झाडाला गळफास घेवून आत्महत्या केली आहे असे सांगण्यात आले. 12 वर्षापुर्वी गहान खरेदी खत करून घेतलेली जमीन म्हणजे हा प्रकार सावकारी कायद्यात सुध्दा मोडतो असे ऍड.अरिबोद्दीन यांनी सांगितले.