मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना बँकांनी कोणतेही पैसे कपात करू नये

महिलांच्या खात्यात लाभाची रक्कम थेट जमा करावी

नांदेड:- मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील अंतिम पात्र लाभार्थी महिलांना जुलै व ऑगस्ट 2024 या महिन्याच्या एकत्रित लाभ त्यांच्या बँक खात्यात नुकताच जमा करण्यात आला आहे. परंतु काही बँकांनी या योजनेतर्गंत आर्थिक लाभ आहरित करता येत नसल्याचे निदर्शनास आले आहे. तरी बँकानी या योजनेतील लाभाची रक्कम इतर कर्जाच्या बदल्यात समायोजित न करता थेट लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा करावी, असे निर्देश शासनाच्यावतीने दिले आहेत.

 

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतून हस्तांतरीत केलेले आर्थिक लाभ रक्कम कोणत्याही थकीत कर्जाच्या बदल्यात समायोजित केले जाऊ नये. ही रक्कम विशिष्ट उद्देशासाठी असून ती इतर कर्ज समायोजनासाठी वापरता येणार नाही. या योजनेतील रक्कम त्यांच्या खात्यात वर्ग केल्यानंतर लाभार्थी महिलांना कोणत्याही थकबाकीच्या समायोजनामुळे रक्कम काढण्यास नकार देण्यात येऊ नये. काही लाभार्थ्याकडे बँकेचे प्रलंबित असलेल्या कर्जाची परतफेड न केल्यामुळे बँक खाते गोठविण्यात आले असल्यास सदर बँक खाते तात्काळ सुरु करण्यात यावे व या योजनेतर्गंत लाभार्थ्यांना प्राप्त होणारी लाभाची रक्कम लाभार्थ्यांना उपलब्ध करुन द्यावी. अशा सूचना महाराष्ट्र शासनाच्या महिला व बाल विकास विााचे सचिव डॉ. अनुपकुमार यादव यांनी दिल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!