दहा महिन्यांचा बालक सोबत असलेल्या मनोरुग्ण महिलेची काळजी घेतली वजिराबाद पोलीसांनी

नांदेड(प्रतिनिधी)-एक 25 ते 30 वर्षीय मनोरुग्ण महिला अत्यंत लहान अशा निरागस जळपास 10 महिन्याच्या बालकासह डॉक्टर्सलेनमध्ये धिंगाणा घालत असतांना कधीच बंद न होणारे दुकान म्हणजे पोलीस आले आणि त्यांनी त्या महिलेला उपचारासाठी शासकीय रुग्णालयात आणि बालकाला लोहा येथील बालसुधार गृहात दाखल केले आहे.
उमरेकर हॉस्पीटलमध्ये कार्यरत चक्रधर खानसोळे यांनी दिलेल्या अर्जानुसार आज दुपारी 1.30 वाजता एक 25 ते 30 वयोगटातील मनोरुग्ण महिला जोर-जोरात ओरडून धिंगाणा घालत होती. तिच्यासोबत जवळपास 10 महिन्याचा एक बालक पण होता. कोणी काही बोलले तर ती त्याला मारहाण करत होती. नाव गाव विचारले असता तिला काहीच सांगता येत नव्हते.
अशा परिस्थितीत कधीच न बंद होणारे दुकान म्हणजे पोलीसांचे असते आणि खानसोळे यांनी पोलीसांनाच बोलावले. त्यावेळी पोलीस अंमलदार शरद सोनटक्के आणि चाईल्ड लाईनचे सदस्य तेथे पोहचले आणि त्यांनी त्या महिलेला पोलीसांच्या वाहनात बसवून घेतले. त्यावेळी त्या पोलीसांना आणि चाईल्ड लाईनच्या सदस्यांना काय मेहनत करावी लागली हे अनेक जणांनी पाहिले. ण लीसांच्या मेहनतीला य आले आणि महिलेला पोलीसांनी शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. तसेच तिच्याजवळ असणारा जवळपास 10 महिन्याचा निरागस बालक पोलीसांनी लोहा येथील बाल सुधारगृहात नेऊन दाखल केला.
एखादी महिला रस्त्यावर गडबड करते आहे तर ती कोठून आली, कशी आली, तिची अवस्था अशी का झाली, तिच्यासोबतचा बालक कोण आहे. या सर्व प्रश्नांची उत्तरे पोलीसांकडे असतील काय? परंतू पोलीसांनी आपली जबाबदारी समजूनच या कामात हातभार लावला. पोलीस निरिक्षक परमेश्र्वर कदम यांच्या मार्गदर्शनात पोलीस अंमलदार शरद सोनटक्के यांनी या महिलेची दखल घेवून तिला उपचारासाठी पाठविले आणि त्या निरागस बालकाला बाल सुधारगृहात पाठविले या घटनेची आम्ही दखल घेतली नाही तर आम्ही सुध्दा शब्दगुंड ठरू. अभिनंदन पोलीसांचे…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!