नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत बळीरामपुर येथे एका 20 वर्षीय युवकाला मारहाण करून त्याच्या खिशातील 10 हजार रुपये लुटण्याचा प्रकार घडला आहे.
करण किशोर झलारे रा.धनेगाव यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 10 ऑगस्टच्या सायंकाळी 6.30 वाजेच्यासुमारास दोन जणांनी बळीरामपुर येथे थांबून त्याला पैशाची मागणी केली. माझ्याकडे पैसे नाहीत असे उत्तर दिल्याने एकाने त्याची मान पकडली आणि दुसऱ्याने आपल्या हातातील कड्याने त्याच्या डोळ्याजवळ मारून त्याला जखमी केले आणि खिशातील 10 हजार रुपये बळजबरीने चोरून नेले आहेत. नांदेड ग्रामीण पोलीसांनी भारतीय न्याय संहितेच्या कलम 309(6), 352, 3(5) नुसार गुन्हा क्रमांक 718/2024 दाखल केला आहे. या गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस निरिक्षक कांबळे हे करीत आहेत.