नांदेड(प्रतिनिधी)-बॅंकेत पैसे भरण्यासाठी गेलेल्या सेवानिवृत्त ग्रामविकास अधिकाऱ्याच्या थैलीतील 1 लाख रुपये चोरट्यांनी ब्लेडने पिशवी कापुन चोरले आहेत.
सेवानिवृत्त ग्रामविकास अधिकारी रामराव पुंडलिकराव सुभेदार(77) रा.येवती ता.मुखेड हे 12 ऑगस्ट रोजी सकाळी 10.45 वाजता महाराष्ट्र ग्रामीण बॅंक शाखा मुखेड येथे 1 लाख रुपये घेवून बॅंकेत भरण्यासाठी गेले. ते लाईनमध्ये उभे असतांना त्यांच्या हातातील कापडाच्या पिशवीला ब्लेडने कापुन चोरट्यांनी त्यातील 1 लाख रुपये चोरून नेले आहेत. मुखेड पोलीसांनी हा गुन्हा भारतीय न्याय संहितेच्या कलम 303(2) प्रमाणे गुन्हा क्रमांक 287/2024 नुसार दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस अंमलदार गोंडे यांच्याकडे देण्यात आला आहे.