नांदेड(प्रतिनिधी)-माजी पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे हे काल नांदेडला आले आहेत.पण आज वृत्तलिहिपर्यंत स्थानिक गुन्हा शाखेतील प्रसिध्द शल्यचिकित्सक डॉ.परमेश्र्वर चव्हाणचा काय निकाल लावला हे मात्र कळले नाही.
7 ऑगस्ट रोजी राज्यातील 12 भारतीय पोलीस सेवेतील अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या. त्यात नांदेड येथे कार्यरत असलेले अपर पोलीस अधिक्षक अबिनाशकुमार यांना नांदेडचे पोलीस अधिक्षक हे पद मिळाले. श्रीकृष्ण कोकाटे यांना प्रतिक्षेत ठेवण्यात आले. त्याच दिवशी श्रीकृष्ण कोकाटे यांनी आजारी रजा नोंद करून घेतली. त्याबद्दलही अनेक चर्चा झाल्या. पण त्या लिहुन आम्ही आमची पातळी खाली आणू इच्छीत नाही.
काही पोलीस अंमलदारांना माजी पोलीस अधिक्षकांनी जाता-जाता नवीन पदस्थापना दिल्या. त्या योग्य की अयोग्य यावरही अनेक चर्चा झाल्या. पण ती जबाबदारी आता नवीन पोलीस अधिक्षकांवर आहे. कारण त्या चर्चांमधील चांगल्या व्यक्तींबद्दल आणि वाईट व्यक्तींबद्दल निर्णय घेण्याचा अधिकार आता नुतन पोलीस अधिक्षकांना आहे. नुतन पोलीस अधिक्षकांनी पोलीसांची इभ्रत वेशीवर टांगणार नाहीत अशांना सुरक्षा दिली पाहिजे आणि जे टांगणार ेत त्यांचा शोब कला पाहिजे.
या सर्व प्रकारामध्ये स्थानिक गुन्हा शाखेत गुपचूप कार्यरत डॉ.परमेश्र्वर ठाणुसिंग चव्हाण यांचा काही निकाल लावला नाही. प्राप्त असलेल्या कागदपत्रांच्या आधारावर त्यांची नियुक्ती नियंत्रण कक्षात आहे. पण तोंडी आदेशाने स्थानिक गुन्हा शाखेत कार्यरत आहेत. पण ते तोंडी आदेश कोणाचे आहेत याचा उल्लेख मात्र त्या कागदपत्रांमध्ये नाही. माजी पोलीस अधिक्षकांच्या काळातील हा एक अडकलेला रोडा नुतन पोलीस अधिक्षकांना काढावा लागेल.