नांदेड(प्रतिनिधी)-योगेश्र्वरांनी जाता-जाता दोन वेळेस दोन-दोन आणि एका वेळेस असा 14 पोलीस अंमलदारांना बदल्या दिल्या आहेत. त्या 14 मधील 8 स्थानिक गुन्हा शाखेत पाठविले आहेत.
पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी सध्या बदली झाल्यानंतर आजारी रजेवर आहेत. शासनाने त्यांना प्रतिक्षा यादीत ठेवले आहे. पण त्यांनी जाण्याअगोदर स्थानिक गुन्हा शाखेत आणि इतर ठिकाणी 14 जणांच्या बदल्या केल्या आहेत. त्यामधील 8 जण स्थानिक गुन्हा शाखेत पाठविले आहेत.
बदली करण्यात आलेले पोलीस अंमलदार पुढील प्रमाणे आहेत.त्यांची नवीन नियुक्ती कंसात लिहिली आहे.चालक पोलीस अंमलदार साहेबराव देवराव शिंदे-मोटार परिवहन विभाग(स्थानिक गुन्हा शाखा), गोवर्धन माधवराव इडोळे, रविकुमार हनमंतराव हराळे-पोलीस मुख्यालय (स्थानिक गुन्हे शाखा), परसराम सुर्यकांत लुंगारे, संभाजी नागोराव मुंडे,शिवराज जयसिंगराव धोंडगे,विश्र्वनाथ देविदास पवार-पोलीस मुख्यालय (स्थानिक गुन्हे शाखा), जयश्री शंकरराव राचेवाड, विष्णु सोपान दहिफळे-पोलीस मुख्यालय (जीपीयु), सिमा गोविंद जोंधळे-नियंत्रण कक्ष(जिल्हा विशेष शाखा), चालक पोलीस अंमलदार अमोल सुर्यकांत सुर्यकांत घेवारे, वैभवसिंह भसिंह गुणावत-पोलीस मुख्यालय (बॉम्ब शोधक व नाशक पथक), बंडू केशवराव कलंदर-पोलीस ठाणे विमानतळ पण सलग्न स्थानिक गुन्हे शाखा(स्थानिक गुन्हे शाखा), या बदल्यांमध्ये एका पोलीस अंमलदाराला अर्धापूर ते भोकर पोलीस ठाणे येथे बदली दिली आहे. पण त्यांचे नाव मिळविण्यात आम्हाला अपयश आले आहे.