नांदेड(प्रतिनिधी)-मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाची स्थापना तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकारातून 2014 मध्ये स्थापन झाली. पण मागील दोन वर्षाच्या काळात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नांदेड जिल्ह्यासाठी मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कक्षाच्या माध्यमातून जिल्ह्यातील 625 रुग्णांना साडे पाच कोटी रुपयांचा निधी मिळाला असल्याची माहिती शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे पक्ष प्रमुख रामहरी भिमराव राऊत यांनी पत्रकार परिषदेत दिली.
या पत्रकार परिषदेला शिवसेना जिल्हाप्रमुख गंगाधर बडुरे, तुलजेश यादव, गजानन गिरी, शिवाजी पन्नासे आदींची उपस्थिती होती. राज्यामध्ये 1 ऑगस्ट पासून आरोग्याची वारी आपल्या दारी ही संकल्प यात्रा सुरू झाली असून याच यात्रेच्या माध्यमातून दि.7 ऑगस्ट रोजी नांदेड जिल्ह्यात आगमन झाले आहे. ही यात्रा राज्यभर जाणार असून आतापर्यंत 2 वर्षात 301 कोटीची मदत 36 हजार रुपयांचा राज्यात झाली आहे. जास्तीत जास्त रुग्णांनी याचा लाभ घ्यावा. मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता ही संकल्पना मंगेश चिवटे यांनी समोर आणली. आज या योजनेच्या माध्यमातून राज्यातील हजारो कुटूंबियांना याचा लाभ मिळाला आहे अशी माहिती आयोजित पत्रकार परिषदेत कक्ष प्रमुख रामहरी राऊत यांनी पत्रकार परिषदेत दिली.