नांदेड(प्रतिनिधी)-बिलोली शहरातील किराणा दुकानदार घरी जात असतांना त्याच्या वाहनातील डिक्कीत ठेवलेले 60 हजार रुपये चोरणाऱ्या चोरट्याला बिलोली पोलीसांनी गजाआड केले आहे. चोरी गेलेली सर्व 60 हजार रुपये रक्कम जप्त करण्यात आली आहे.
बिलोली शहरातील छोटी गल्ली येथील किराणा दुकानदार अली अब्दुल रशिद चाऊस हे 27 जुलै रोजी रात्री 9.30 वाजता आपले दुकान बंद करून घरी जाण्याच्या तयारीत असतांना त्यांनी आपल्या आईने बचत गटाचे उचलून आणलेले 60 हजार रुपये आपल्या दुचाकी गाडीच्या डिक्कीत ठेवले आणि दुकान बंद करे पर्यंत त्या ठिकातील 60 रुपये चोरटयांनी लांबवले होते. याप्रकरणी बिलोली पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 174/2024 दाखल झाला होता. या गुन्ह्याचा तपास पोलीस अंमलदार एम.एस.मुद्देमवार यांच्याकडे होता. पोलीसांनी या प्रकरणी शेख इमरान शेख सलीम (21) रा.ईदगाहगल्ली यास ताब्यात घेवून विचारपुस केली असता त्यानेच 60 हजार रुपये चोरल्याची कबुली दिली आणि चोरलेले 60 हजार रुपये पोलीसांना काढून दिले. पोलीसांनी ते पैसे कायदेशीररित्या जप्त केले आहेत. उत्कृष्ट कामगिरी करत चोरी गेलेली सर्व रक्कम जप्त करणाऱ्या बिलोली पोलीसांचे पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे, अपर पोलीस अधिक्षक अबिनाशकुमार, डॉ.खंडेराय धरणे बिलोलीचे पोलीस उपअधिक्षक बाळकृष्ण हनपुडे पाटील यांनी बिलोलीचे पोलीस निरिक्षक अतुल भोसले, पोलीस उपनिरिक्षक दिलीप मुंडे, पोलीस अंमलदार एस.एम.मुद्देमवाड, व्यंकट धोंगडे यांचे कौतुक केले आहे.