नांदेड(प्रतिनिधी)-नागार्जुना पब्लिक स्कुलमध्ये शिकणाऱ्या बालाकाना इंग्रजी शिकवण्यासाठी शाळेच्यावतीने वेगळे 2 हजार रुपये वसुल केले जात असल्याची धक्कादायक माहितीसमोर आली आहे. नागार्जुना पब्लिक स्कुलने आपल्या सहा शिक्षकांवर केलेला अन्याय अद्याप संपलेला नाही. तर आता विद्यार्थ्यांसोबत
नागार्जुना पब्लिक स्कुलमध्ये शिक्षण घेत असलेल्या पाल्यांच्या काही पालकांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांची दोन पाल्ये नागार्जुना पब्लिक स्कुलमध्ये शिकतात. माहिती सांगणारे पालक हे शासकीय नोकर आहेत. परंतू त्यांना इंग्रजी चांगली येत नाही. म्हणून जगासोबत स्पर्धेत उतरतांना आपल्या मुलांनापण इंग्रजी यावी म्हणूनच त्यांनी आपल्या पाल्यांना नागार्जुना पब्लिक स्कुलमध्ये शिकण्यासाठी पाठविले. असे अनेक पालक आहेत. काही पालक हे पैसेवाले आहेत. आपल्या पाल्यांना इंग्रजी बोलता येत नाही याची तक्रार घेवून हे पालक एकदा शाळेत गेले असतांना त्यांना सांगण्यात आले की, काही दिवसात सर्व काही ठिक होईल. काही दिवसानंतर शाळेतील कर्मचारी त्यांना फोन करू लागले त्या फोनमध्ये ते असे सांगत होते की, तुमच्या पाल्यांना इंग्रजी बोलता आली पाहिजे असे तुम्हाला हवे असेल तर त्यासाठी स्वतंत्रपणे दोन हजार रुपये वेगळे भरावे लागतील त्याची पावती मिळणार नाही.या पालकांनी एक व्हाटसऍप गु्रप तयार केला आहे. त्यामध्ये त्यांनी सर्वांशी चर्चा केली. तेंव्हा काही जणांनी अतिरिक्त पैसे देण्यास होकार दिला. तर काही जणांनी नकार दिला. कारण सर्वांचीच अतिरिक्त पैसे देण्याची ताकत असेल असे नसते.
या दोन पाल्यांसोबत एका वर्गात जवळपास 49 विद्यार्थी आहेत. अशा 6 तुकड्या आहेत. या संदर्भाचा गुणाकार करुन पाहिले असता एका तुकडीमध्ये 49 विद्यार्थी म्हणजे 6 तुकड्यांमध्ये 294 विद्यार्थी आणि प्रत्येकाचे अतिरिक्त 2 हजार म्हणजे 5 लाख 88 हजार एवढी याची रक्कम होते. अशी अतििरिक्त रक्कम घेण्याची गरज, नियमावली, कायदा आहे काय? काही पाल्यांनी फोन करणाऱ्यांना विचारले असता शाळेच्या व्यवस्थापनाकडून आमच्यावर तुम्हाला फोन करण्यासाठी दबाव असल्यामुळे आम्ही फोन करत आहोत असे उत्तर देण्यात आले.
नागार्जुना पब्लिक स्कुलच्या शाळेतील सहा शिक्षकांच्या लढ्यामुळे शैक्षणिक वर्ष 2025-26 पासून शाळेची मान्यता रद्द केली आहे. हा वादच अजून पुर्ण विरामापर्यंत गेला नाही. आता नव्याने विद्यार्थ्यांकडून अतिरिक्त 2 हजार रुपये घेवून त्यांना इंग्रजी शिकवणारा वाद समोर आला आहे. शाळेची मान्यताच इंग्रजी शाळेची आहे. म्हणजे शाळेची प्रत्येक कृती ही इंग्रजी भाषेतूनच होणार आहे. मग या शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना इंग्रजी वेगळी शिकण्यासाठी आणि त्यासाठी अतिरिक्त पैसे देण्याची गरज आहे काय असा प्रश्न पालकांकडून उपस्थित होत आहे.