नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड जिल्ह्यातील शहर वाहतुक विभागात कार्यरत असलेले सहाय्यक पोलीस उपनिरिक्षक काकासाहेब नागोराव रोडके यांना सुध्दा पदोन्नती मिळाली आहे. त्यांना आता पदोन्नतीसह ठाणे शहरात नियुक्ती देण्यात आली आहे. नांदेड जिल्ह्याचा काका आता महाराष्ट्राचा काका झाला आहे.
मुळ लातूर जिल्ह्याचे राहणारे काकासाहेब रोडके हे आपले पोलीस सेवा सुरु करतांना अंदाजे 1995-96 मध्ये नांदेड जिल्हा पोलीस दलात पोलीस शिपाई या पदावर भरती झाले. त्यांचे नावच काकासाहेब असल्यामुळे सर्वसामान्य पणे पोलीस आणि जनतेतील मंडळी त्यांना काका या शब्दानेच आदर देत गेली. ज्या-ज्या ठिकाणी त्यांनी काम केले. त्या-त्या ठिकाणी भरपूर माणसांचा संग्रह जमवला. त्यामुळे काका सर्वांच्या पसंतीचे झाले.
आपल्या जीवनात आलेल्या सर्व अडचणींवर नेहमी हसत त्याला प्रतिसाद देण्याची काकासाहेब रोडके यांची वृत्ती लोकांना भावत गेली आणि त्यातूनच त्याचा जनसंग्रह वाढत गेला. आता ठाणे शहरात नियुक्ती झाल्याने नांदेड जिल्ह्याचा काका आता महाराष्ट्राचा काका झाला असेच म्हणावे लागेल.