नांदेड(प्रतिनिधी)-साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या विचारावर चालून आपले, आपल्या कुटूंबाचे आणि आपल्या समाजाचे भले करण्यासाठी युवकांनी प्रयत्न करावा असे प्रतिपादन भारतीय जनता पार्टीचे महानगराध्यक्ष दिलीप कंदकुर्ते यांनी केले.
शहरातील प्रितीनगर भागात अण्णाभाऊ साठे जन्मोत्सवानिमित्त आयोजित कार्यक्रमात दिलीप कंदकुर्ते बोलत होते. या कार्यक्रमात इतर उपस्थितांमध्ये ज्येष्ठ पत्रकार रामप्रसाद खंडेलवाल, नगरसेवक नागेश कोकुलवार, पोलीस उपनिरिक्षक रमेश गायकवाड, मोहन राठोड, सामाजिक कार्यकर्ते प्रितम जोंधळे, युवा मोर्चाचे मलहोेत्रा यांची उपस्थिती होती.
प्रथम ध्वजारोहण, साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरूवात झाली.या प्रसंगी पुढे बोलतांना दिलीप कंदकुर्ते यांनी अण्णाभाऊ साठे यांच्या जीवनाविषयी प्रकाशीत झालेल्या, त्यांनी लिहिलेल्या विविध पुस्तकांचे वाचन करा ज्यातून आपल्याला एक दिशा प्राप्त होईल. राज्य शासनाने अनेक योजना जाहीर केल्या आहेत. त्या सर्व योजनांचा लाभ घेण्यासाठी प्रयत्न करा. त्यासाठी मायावतीने मदत केली जाणार आहे.
याप्रसंगी बोलतांना पत्रकार रामप्रसाद खंडेलवाल म्हणाले की, विविध वाद्यांमध्ये मोठी रक्कम खर्च करून आनंद व्यक्त करण्याऐवजी जमलेल्या निधीतून आपल्या समाजातील गरजवंताची मदत करा ही खऱ्या अर्थाने अण्णाभाऊ साठेंना अभिवादनाची दिशा ठरेल.
या कार्यक्रमाचे आयोजन प्रितीनगर भागातील किरण पारधे, बंटी पारधे, संदीप पारधे, दुर्गेश पारधे, अंकुश केदारे, नागेश हातांगळे, विशाल गायकवाड, अजय पारधे, तुलजेश पारधे, कृष्णा पारधे, विश्र्वांभर पारधे, रमेश पारधे, सिध्दांत साबळे, विशाल पारधे, मारोती बुरडे यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले होते.