नांदेड(प्रतिनिधी)-हिमायतनगर शहरातील हनुमान मंदिरात चोरी करणाऱ्या चोरट्याला हिमायतनगर पोलीसांनी 24 तासात गजाआड केले आहे. दि.28 जुलै रोजी हिमायतनगर शहरातील लकडोबा चौक येथील हनुमान मंदिराची खिडकी तोडून चोरट्यांनी मंदिरातून ध्वनीक्षेपक यंत्र व इतर साहित्य असा 40 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला होता. या संदर्भाने हिमायतनगर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 195/2024 दाखल करण्यात आला होता. पोलीस उपमहानिरिक्षक शहाजी उमाप, पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे, अपर पोलीस अधिक्षक अबिनाशकुमार, डॉ.खंडेराय धरणे, पोलीस उपअधिक्षक डॅनियल बैन यांच्या मार्गदर्शनात हिमायतनगरचे पोलीस निरिक्षक अमोल भगत , सहाय्यक पोलीस उपनिरिक्षक कोमल कागणे, पोलीस अंमलदार शाम नागरगोजे यांनी परिश्रम घेवून गणेश यादव भालेराव (48) रा.बोरगाव रोड भोकर यास ताब्यात घेतले. त्याच्याकडून चोरी केलेले ध्वनीक्षेप यंत्र 40 हजार रुपये किंमतीचे जप्त करण्यात आले आहे. Kanthak Suryatal Post Views: 1,721 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation मोटारसायकल चोरी करणारी टोळी बिलोली पोलीसांच्या ताब्यात मराठवाड्यातील खालसा झालेल्या वर्ग दोनच्या इनाम व देवस्थानच्या जमिनी वर्ग एक करण्याचा निर्णय