कोणत्याहीक्षणी विष्णुपूरी प्रकल्पाचे दरवाजे उघडण्यात येतील

नांदेड(प्रतिनिधी)-कै.डॉ.शंकरराव चव्हाण विष्णुपूरी प्रकल्प आज 83 टक्के भरला आहे. पाणलोट क्षेत्रात होणार सतत पाऊस यामुळे कोणत्याही क्षणी विष्णुपूरी धरणाचे उघडले जाण्याची शक्यता आहे. गोदावरी नदीकाठी राहणाऱ्या पुढील गावातील लोकांनी आपल्या मालत्तेचे आणि जिवीताचे रक्षण करण्यासाठी दक्षता घ्यावी असे आवाहन पुर नियंत्रण अधिकारी कै.डॉ.शंकरराव चव्हाण विष्णुपूरी प्रकल्प बंधारा असर्जन यांनी केले आहे.

गेल्या 72 तासापासून सर्वत्र सतत पाऊस सुरू आहे. पुढे येणाऱ्या दोन-तीन दिवसात सुध्दा मुसळधार आणि अतिमुसळधार पावसाची शक्यता वेधशाळेने वर्तविली आहे. 25 जुलै रोजी सकाळी विष्णुपूरी प्रकल्प 83 टक्के भरलेला आहे आणि विष्णुपूरी प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये आणि विष्णुपूरी धरणाच्यावर असणाऱ्या प्रकल्पांमध्ये पाणी भरत चालले आहे. त्यामुळे तेथून पाण्याची आवक वाढेल. त्याप्रमाणात विष्णुपूरी धरणाचे दरवाजे कोणत्याही क्षणी उघडले जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे विष्णुपूरी बंधाराच्या खालच्या बाजूस असणाऱ्या सर्व गावांतील नागरीकांच्या मालमत्तेचे, जिविताचे, पशु धनाचे, विटभट्टी साहित्याचे कोणतेही नुकसान होणार नाही यासाठी जनतेने सतर्क राहावे तसेच प्रकीय स्तरावरून या गावांना दक्षतेचा इशारा द्यावा असे पुर नियंत्रण अधिकाऱ्यांनी सुचवले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!