नांदेड(प्रतिनिधी)-25 जुलै रोजी 2012 रोजी एका वादात का.देवानंद हनमंते यांचा खून झाला होता. त्यांचे मित्र मंडळी तेंव्हापासून दरवर्षी त्यांच्या स्मृतीदिनानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन करतात. यंदाही हा कार्यक्रम आज त्रिरत्न विहार डॉ.आंबेडकर नगर येथे पार पडला. त्यात एकूण 60 रक्तदात्यांनी रक्तदान केले. या रक्तदान शिबिरात जीवनआधार या रक्तपेढीच्या कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.
का.देवानंद हनमंते यांच्या स्मृतीदिनानिमित्त आज त्रिरत्न विहारात बुध्द वंदना घेतांना डॉ.आंबेडकरनगर येथील बहुसंख्य नागरीक उपस्थित होते. देवानंद हनमंते यांच्या मित्र मंडळाने दरवर्षी 25 जुलै रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन मागील 12 वर्षापासून केले आहे. यंदा 60 रक्तदात्यांनी रक्तदान करून का.देवानंद हनमंते यांना अभिवादन केले.
याप्रसंगी राहुल सोनसळे, सुभाष हनमंते, रवि बनसोडे, साहेबराव कांबळे, भिमराव चित्ते, ऍड.यशोनिल मोगले, महे पंडी, धम्मा कांबळे, सुभाष कांबळे, सचिन कांबळे, समा सावंत, सोमेश वाघमारे, वैभव जाधव, विजयकुमार गोरे, रॉकी मोरे, सचिन लांडगे यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती.