नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड जिल्ह्यातील जिल्हा परिषदेचेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करणवाल यांनी आपल्या सेवेचे एक वर्ष पुर्ण केले. त्या संदर्भाने त्यांच्याकडे येणाऱ्या लोकांनी त्यांच्यासाठी पुष्पगुच्छ आणण्याऐवज शालेय साहित्य आणावे अशी सुचना केली होती. त्यानुसार आलेले शालेय साहित्य आज मिनल करणवाल यांनी उमरी येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत बालकांना वाटप केले.
भारतीय प्रशासनिक सेवेतील अधिकारी मिनल करणवाल यांनी सन 2023 मध्ये 22 जुलै रोजी नांदेड जिल्ह्यात कामकाजाची सुरूवात केली होती. काल त्यांनी आपल्या सेवेचे एक वर्ष पुर्ण केले. सर्वसाधारणपणे एक वर्षाचा कालखंड पुर्ण झाल्यानंतर अधिकाऱ्यांचा सन्मान होत असतो. याची कल्पना असल्याने मिनल करणवाल यांनी जिल्हा परिषदेमध्ये सर्वांना अगोदरच सुचना दिल्या होत्या की, पुष्पगुच्छ आणण्याऐवजी शालेय साहित्य देवून माझा सन्मान करावा. त्यानुसार काल अनेकांनी त्यांची भेट घेवून वह्या, पेन, पेन्सिल, कंपास आणि इतर साहित्य देवून त्यांचा सन्मान केला. आज मिनल करणवाल यांनी जिल्हा परिषदेच्या उमरी येथील शाळेत जावून त्यांना मिळालेले शालेय साहित्य बालकांमध्ये वाटप केले.