नांदेड-आंबेडकरी चळवळीच्या नावावर स्वतःची पोळी भाजून घेणाऱ्या आणि संधी साधू नेत्यांपासून आता सावध होण्याची वेळ आली असून चळवळीतील सच्चा नेत्याच्या पाठीशी उभे रहा असे आवाहन आंबेडकरी चळवळीतील नेते प्राध्यापक राजू सोनसळे यांनी केले आहे . नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघातील सिद्धार्थनगर येथील पंचशील विहाराला भेट दिली असता ते येथील नागरिकांशी संवाद साधत होते.
पुढे बोलताना प्रा. राजू सोनसळे म्हणाले की , नुकत्याच झालेल्या नांदेड लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीकडून ओबीसीचा उमेदवार देण्यात आला होता परंतु ओबीसीच्या उमेदवाराला निवडून आणण्यासाठी वंचित मधील आणि आंबेडकरी चळवळीतील काही स्वार्थी नेतृत्व घराच्या बाहेर पडले नाही . आपल्या घरातूनच आपण प्रचार करत असल्याचे नाटक त्यांनी केले. परिणामी वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराला पराभव स्वीकारावा लागला. खरे तर अशा परपोषी नेतृत्वापासून आपण सावध होण्याची वेळ आली आहे. चळवळीच्या नावावर स्वतःची पोळी भाजून घेणे, स्वतःचा आर्थिक विकास करून घेणे , स्वतःला मिरवणे आणि स्वतःचे नेतृत्व सिद्ध करण्याचा कुटील डाव आखणाऱ्या नेतृत्वांना बाजूा सारून सच्चा नेतृत्वा्या पाठीशी उभे राहण्याची गरज आहे.
गेल्या पंचवीस वर्षापासून आंबेडकरी चळवळीत आम्ही संघर्ष करत आहोत. बेरोजगार तरुणांच्या समस्या सोडविण्यासाठी सातत्याने प्रयत्न करत आहोत. आंबेडकरी चळवळ आलेल्या प्रत्येक संकटाचा निकराने सामना करण्यासाठी ही योगदान देत आहोत. मात्र आयत्या वेळी येऊन स्वहित साधणाऱ्या नेतृत्वाने आंबेडकरी चळवळीला ग्लानी आणली आहे. त्यामुळे आता अशा नेतृत्वाला बाजूला सारून आंबेडकरी चळवळीसाठी योगदान देणाऱ्या सच्चा नेतृत्वाच्या पाठीशी उभे राहून येत्या विधानसभा निवडणुकीत आपल्या चळवळीला बळकटी देण्याची गरज असल्याचेही ते म्हणाले यावेळी अनेक जण उपस्थित होते.