नांदेड(प्रतिनिधी)-विशाळगड गाजापूर येथे झालेल्या दंगलीची सखोल चौकशी करून दोषींवर कार्यवाही करण्यासाठी आज राज्यभरात जिल्हाधिकारी कार्यालये, तहसील कार्यालये यांच्यासमोर मोठ्या संख्येत मुस्लीम समाजाने धरणे आंदोलन केले. नांदेडमध्येही हे धरणे आंदोलन संपन्न झाले. सर्वप्रकार शांतते पार पडला.
विशाळगड जवळील गाजापूर येथे काही ठिकाणचे अतिक्रमण पाडण्यात आले. त्यात एका प्राथनास्थळाला सुध्दा इजा झाली असा आरोप निवेदनात आहे. या संदर्भाने मुस्लिम समाजाने आज शुक्रवारी प्रार्थनेनंतर धरणे आंदोलन होईल आणि सर्व मुस्लिम बांधवांनी सहभागी व्हावे असे आवाहन केले होते. घडलेल्या प्रकाराला गांभीर्याने घेत पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे, अपर पोलीस अधिक्षक अबिनाशकुमार, पोलीस उपअधिक्षक सुशिलकुमार नायक यांच्या नेतृत्वात अनेक पोलीस अधिकारी आणि पोलीस अंमलदार दुपारी 11 वाजल्यापासून जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात उपस्थिती होते. घडलेल्या प्रकाराचा निषेध व्यक्त करतांना अनेकांनी आप-आपल्या परीने आपली मते व्यक्त केली. निवेदनात लिहिल्याप्रमाणे त्या दंगलीत हिंसारही झाला, जाळपोळ झाली, छोट-छोट्या चहाच्या टपऱ्या तोडल्या आणि प्रार्थनास्ळाला सुध्दा धक्का लावला. यावेळी हल्लेखोर जय श्रीरामच्या घोषणा देत होते असे निवेदनात लिहिले आहे. याप्र्रसंगी एमआयएम पक्षाचे मराठवाडा अध्यक्ष फेरोज खान उर्फ लाला, नांदेड जिल्हाध्यक्ष मिर्झा अहेमद बेग, शहराध्यक्ष साबेर चाऊस यांच्यासह मोठा जनसमुदाय उपस्थित होता. जनसमुदयातील काही जणांनी नारा ए तकबीर अल्लाहो अकबर अशा घोषणा दिल्या. जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देवून धरणे आंदोलनाची सांगता झाली.