नांदेड(प्रतिनिधी)-शाहुनगर, वाघाळा रस्त्यावर झालेल्या जिवघेणा हल्याप्रकरणी नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अजय भगवान जोगदंड यांनी दिलेल्या तक्रारीनुसार उघड्या रस्त्यावर लघुशंका का करतोस महिला, बाया असतात असे समजून सांगत असतांना चार जणांना पैकी तीन जणांनी त्याला पकडले आणि एकाने त्याच्या मांडीवर खंजीरने अनेक वार केले. या संदर्भाने नांदेड ग्रामीण पोलीसांनी 18 जुलै रोजी सायंकाळी 9.30 वाजता चार जणांविरुध्द गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यात जिवघेणा हल्ला करणे असे भारतीय न्याय संहितेची कलमे जोडले आहेत. या गुन्ह्याचा क्रमांक 623/2024 असा आहे. या प्रकरणात फिर्यादीप्रमाणे डोरोमन समीर जोंधळे, आकाश राठोड आणि अखील राठोड मारहाण करणाऱ्यांची अशी नावे आहेत.
वाघाळा रस्त्यावर युवकावर जिवघेणा हल्ला
