नांदेड(प्रतिनिधी)-वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ऍड. प्रकाश आंबेडकर हे दि.19 जुलै रोजी सकाळी 11 वाजता कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत. पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीने समाधानकारक रित्या यश मिळवल नसल तरी विधानसभेच्या अनुशंगाने त्यांनी राज्यात कार्यकर्त्यांचा संवाद मेळावा आयोजित केला आहे. त्याच अनुशंगाने दि.19 रोजी नांदेड येथे कौठा येथील सप्तगिरी प्लॉझा येथे कार्यकर्त्यांशी संवाद करणार आहेत.
यावेळी पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते यांच्याकडून मते जाऊन घेणार आहेत. या मेळाव्याला वंचितचे राज्य उपाध्यक्ष तथा नांदेड पक्ष निरिक्षक सर्वजित बनसोडे, राज्य सरचिटणीस शाम कांबळे, जिल्हाध्यक्ष शिवा नरंगले, प्रा.राजेश पालमकर, प्रा. राजू सोनसळे यांच्यासह आदींची यावेळी उपस्थिती राहणार आहे.
ऍड.प्रकाश आंबेडकर उद्या नांदेडमध्ये
