नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड शहरात दिवसेंदिवस वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी नांदेड पोलीसांनी मोहिम हाती घेतली. यातच कौठा परिसरात गावठी पिस्टलसह खंजीर घेवून फिरणाऱ्या तिघांना ग्रामीण पोलीसांनी ताब्यात घेतले. या तिघांना न्यायालयात हजर केले असता. यातील एका आरोपीला एका दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली.
नांदेड शहरात मागील काही दिवसांपासुन गुन्हेगारीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. यावर आळा घालण्यासाठी पोलीसांकडून अनेक कार्यवाह्या करण्यात येत असल्या तरी नांदेड शहरात बिनधास्तपणे गावठी कट्टे, खंजीर, तलवारी, यासह धारधार शस्त्रे घेवून फिरणारी टोळी नांदेड शहरात मोठ्याप्रमाणात आढळून येत आहे. यातच मंगळवारी सायंकाळी कौठा परिसरात काही तरुण गावाठी कट्टा आणि खंजीर घेवून फिरत असल्याची माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे नांदेड ग्रामीण पोलीसांनी कौठा परिसरात सापळा रचून यात अमन किशोर जोगदंड (20) रा.खाब्रोगडेनगर, कपिल हिरामन सदावर्ते(27) रा.चेअरमन पाटी पुर्णा रोड आणि आकाश गजानन गणगोपालवार (23) रा.पुष्पनगर या तिघांना ताब्यात घेतले. यांच्याकडून एक गावठी पिस्तुल, एक जीर, एक दुचाकी आणि चोरीचे दागिणे असा एकूण 2 लाख 90 हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कार्यवाही उपविभागीय पोलीस अधिकारी सुशिलकुमार नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.