नांदेड आकाशवाणीवर बुधवारी ऐका ! मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ;साडेअकरा वाजता रेखा कदम यांची विशेष मुलाखत

 

नांदेड- मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना कोणासाठी ? कशासाठी ? त्यासाठी कोणत्या अर्जांची आवश्यकता आहे. अर्जासाठी कोणते कागदपत्र हवे आहेत, याबाबतची सोपी आणि सुटसुटीत माहिती देणारी एक मुलाखत उद्या बुधवारी नांदेड आकाशवाणी वरून साडेअकरा वाजता प्रसारित होणार आहे .श्रोत्यांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा माहिती कार्यालयाने केले आहे .

 

नांदेड जिल्ह्यामध्ये राज्याचे ग्रामविकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन, जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करणवाल , मनपा आयुक्त डॉ. महेश डोईफोडे, यांच्या मार्गदर्शनात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची प्रभावी अंमलबजावणी सुरू आहे. उद्या या योजनेबाबत सद्यस्थिती व योजनेचे महत्त्व विशद करणारी मुलाखत साडेअकरा वाजता नांदेड आकाशवाणी केंद्रावरून प्रसारित होत आहे.

 

या योजनेमध्ये ज्यांचा प्रत्यक्ष सहभाग आहे त्या नांदेड जिल्हा परिषदेच्या महिला व बालविकास उपमुख्य कार्यकारी अधिकारी रेखा कदम श्रोत्यांशी संवाद साधणार आहेत.

 

जिल्हा माहिती कार्यालय व नांदेड आकाशवाणीची संयुक्त निर्मिती असलेल्या या कार्यक्रमात श्रीमती कदम अर्ज भरणयासाठी कुठले दस्ऐवज आवश्यक आहे, ऑनलाइन अर्ज भरायचा की ऑफलाईन अर्ज भरायचा, अर्ज भरण्यासाठी कोणाची मदत घ्यायची, ही योजना म्हणजे कशी आर्थिक क्रांती आहे, या संदर्भातील सर्व माहिती विस्तृत देणार आहेत. अर्धा तास ही मुलाखत चालणार आहे. या योजनेच्या संदर्भात ज्यांच्या मनात अनेक प्रश्न असतील त्यांनी ही मुलाखत निश्चित ऐकावी, असे आवाहन जिल्हा माहिती कार्यालयामार्फत करण्यात आले आहे.

 

आकाशवाणीचे नांदेडचे प्रसारण अधिकारी राहुल आत्राम यांनी ही मुलाखत घेतली आहे. आकाशवाणीच्या 101.1 मेगा हट्स आणि आपल्या मोबाईल वरील न्यूज ऑन एआईआर या ॲपवरही ही मुलाखत उद्या साडेअकरा वाजता ऐकता येणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!