नांदेड,(प्रतिनिधी)-महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागाने 6 भारतीय पोलीस सेवेतील अधिकाऱ्यांच्या बदल्या करून त्यांना नवीन नियुक्ती दिल्या आहेत. त्यामध्ये नांदेड येथील विशेष पोलीस महानिरीक्षक पदावर पद अवनत करून पोलीस उप महानिरीक्षक पदावर शहाजी उमाप यांना नियुक्ती देण्यात आली आहे.
दिनांक 9 जुलै रोजी महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागाने काढलेल्या बदली आदेशामध्ये 6 भारतीय पोलीस सेवेतील अधिकाऱ्यांचा समावेश आहे त्यात विशेष पोलीस महानिरीक्षक नांदेड परीक्षेत डॉ. शशिकांत महावरकर यांना विशेष पोलीस महानिरीक्षक गुन्हे अन्वेषण विभाग पुणे येथे पाठवले आहे. ठाणे शहरातील पूर्व प्रादेशिक विभागाचे अप्पर पोलीस आयुक्त डी टी शिंदे यांना मीरा-भाईंदर -वसई- विरार येथे अपर पोलीस आयुक्त म्हणून पाठवले आहे. अपर पोलीस आयुक्त प्रशासन ठाणे शहर संजय जाधव यांना अपर पोलीस आयुक्त पूर्व प्रादेशिक विभाग ठाणे शहर येथे नियुक्ती दिली आहे. मीरा-भाईंदर- वसई- विरारचे अपर पोलीस आयुक्त श्रीकांत पाठक यांना अपर पोलीस आयुक्त प्रशासन ठाणे शहर या पदावर पाठवले आहे. अभिषेक त्रिमुखे हे राज्य राखीव पोलीस बल गट मुंबई येथे पोलीस उप महानिरीक्षक आहेत.त्यांना अपर पोलीस आयुक्त बृहन्मुंबई या पदावर पाठवले आहे. मुंबईच्या विशेष शाखेत कार्यरत पोलीस आयुक्त शहाजी उमाप यांना पोलीस उप महानिरीक्षक नांदेड परीक्षेत्रात पाठवले आहे.
शहाजी उमाप यांनी आपल्या पोलीस सेवा काळातील सुरुवातीच्या कालखंडात परभणी नांदेड आणि लातूर या तीन जिल्ह्यांमध्ये पोलीस उपाधीक्षक पदावर आणि अपर पोलीस अधीक्षक पदावर काम केलेले असल्यामुळे त्यांना परिक्षेत्रात काम करणे सहज होणार आहे. यांच्या कालखंडात ते कर्दनकाळ म्हणून ओळखले जात होते. आजही त्यांचे तेच स्वरूप मोठ्या स्वरूपात पाहायला मिळेल अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
One thought on “कर्दनकाळ पोलीस उप महानिरीक्षक शहाजी उमाप नांदेड परिक्षेत्रात”