नांदेड(प्रतिनिधी)-आपल्या आईची प्रकृती खराब आहे म्हणून घराला कुलूप लावून सर्व कुटूंब बहिणीच्या घरी गेले असतांना कोणी तरी चोरट्यांनी या संधीचा फायदा घेवून या घरातून 1 लाख 81 हजार रुपयांचा ऐवज लुटून नेला आहे. मुखेड तालुक्यातील एक घरफोडून चोरट्यांनी 36 हजार रुपयांचा ऐवज लंपास केला आहे.
गजानन गंगाधर लिंगे रा.वैभवनगर हडको यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 6 जुलै रोजी रात्री 8 वाजता ते आपल्या आईची प्रकृती खराब आहे म्हणून घराला कुलूप लावून कुटूंबासह बहिणीच्या घरी गेले होते. 7 जुलैच्या सकाळी परत आले तेंव्हा त्यांच्या घराचा कडीकोंडा, कुलूप तोडून चोरट्यांनी 14 ग्रॅम सोन्याचे गंठण, सोन्याची पोत आणि रोख रक्कम असा 1 लाख 81 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे. नांदेड ग्रामीण पोलीसांनी भारतीय न्याय संहितेच्या कलम 331(4), 305 (ए) प्रमाणे गुन्हा क्रमांक 546/2024 दाखल केला आहे.या घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरिक्षक चव्हाण यांच्याकडे देण्यात आला आहे.
मौजे जांब येथील नागोराव झोटींग थोटे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 4 जुलैच्या रात्री 11 ते 5 जुलैच्या पहाटे 4 वाजेदरम्यान कोणी तरी चोरट्यांनी त्यांच्या घररातून सोन्याची पोत, अगठी, गौतम बुध्दाचे सोन्याचे पान, साखळी, कर्णफुल आणि मंगळसुत्र असा 36 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे. मुखेड पोलीसांनी या प्रकार भारतीय न्याय संहितेच्या कलम 331(4), 305 नुसार गुन्हा क्रमांक 214/2024 प्रमाणे दाखल केला आहे. मुखेड पोलीसांनी हा गुन्ह्याचा क्रमांक 2023 असा लिहिला आहे.या गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस उपनिरिक्षक राठोड यांच्याकडे देण्यात आला आहे.