नांदेड(प्रतिनिधी)-एका 45 वर्षीय व्यक्तीला मोटारसायकलवर जात असतांना 4 जुलैच्या रात्री 9 वाजता वांगी पाटी ते इंजेगाव पाटीदरम्यान लुटण्याचा प्रयत्न झाला. दादाराव शंकरराव जाधव (45) हे 4 जुलै रोजी रात्री 9 वाजता दुचाकीवर बसून आपल्या गावाकडे जात असतांना वांगी पाटी ते इंजेगाव पाटील दरम्यान एका चिंचेच्या झाडाजवळ सोहेल फारुख पठाण(20) आणि वाजिद आणि कालीया या तिघांनी खंजीरचा धाक दाखवून बळजबरीने मोबाईल व पैसे लुटण्याचा प्रयत्न केला. नांदेड ग्रामीण पोलीसांनी हा गुन्हा क्रमांक भारतीय न्याय संहितेच्या कलम 309(5), 3(5) नुसार गुन्हा क्रमांक 545 नुसार दाखल केला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरिक्षक कांबळे यांच्याकडे देण्यात आला आहे. Kanthak Suryatal Post Views: 620 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation टिपरच्या धडकेत ऍटोतील तीन जण ठार; तीन जण जखमी हडकोमध्ये घरफोडून 1 लाख 80 हजारांची चोरी; जांब ता.मुखेड येथे 36 हाजरांची चोरी