नांदेड,(प्रतिनिधी)-राज्यभरात आपला विहित कालावधी पुर्ण केलेल्या 259 पोलीस निरिक्षकांना नवीन जागी नियुक्त्या दिल्या आहेत. तसेच आपला कालावधी पुर्ण न केलेल्या 120 पोलीस निरिक्षकांना विशेष बाब म्हणून बदल्या दिल्या आहेत. या बदल्यांमध्ये अनेकांना मुदतवाढ देण्यात आली आहे. काही जणांना पुर्वी झालेल्या बदलीला बदलून नवीन जागी बदली दिली आहे. तसेच काही जणांना पदोन्नती देवून बदल्या दिल्या आहेत. पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांच्या मान्यतेनंतर आस्थापना विभागाचे अपर पोलीस महासंचालक संजीव कुमार सिंघल यांनी बदल्यांचे आदेश जारी केले आहेत. कालावधी पुर्ण केलेल्या पोलीस निरिक्षकांमधून नांदेड येथून दोन जाणार आहेत आणि चार नवीन येणार आहेत. तसेच कालावधी पुर्ण न केलेल्या पोलीस निरिक्षकांमधून तीन पोलीस निरिक्षक दुसऱ्या जिल्ह्यात जात आहेत आणि तीन नांदेडला येत आहेत. पोलीस महासंचालक कार्यालयाने नांदेड, परभणी, चंद्रपुर, हिंगोली जिल्हा गाजवून सध्या स्थानिक गुन्हा शाखा परभणी येथे कार्यरत असलेल्या पोलीस निरिक्षक अशोक घोरबांड यांना अत्यंत महत्वपुर्ण जबाबदारी देत भविष्यातील महिला व पुरूष पोलीस घडविण्याची जबाबदारी देत त्यांना पोलीस प्रशिक्षण केंद्र लातूर येथे बदली दिली आहे.
पोलीस विभागातील बदल्या हा विषय अनेक दिवसांपासून प्रलंबितच होता. मागच्या काही दिवसात पोलीस उपनिरिक्षक, सहाय्यक पोलीस निरिक्षक यांना बदल्या देण्यात आल्या होत्या. दि.30 जून रोजी एकूण 379 पोलीस निरिक्षकांना बदल्या दिल्या आहेत. त्यातमध्ये 259 पोलीस निरिक्षक यांनी आपला विहित कालावधी पुर्ण केला आहे. तसेच 120 पोलीस निरिक्षक यांना विशेष बाब म्हणून बदल्या दिल्या आहेत. कालावधी पुर्ण केल्यानंतर नांदेड जिल्ह्यातून बदलून जाणारे पोलीस निरिक्षक जगदीश राजन्ना भंडरवार यांना दहशतवाद विरोधी पथकात पाठविले आहे.बॉम्ब शोधक व नाशक पथकातील पोलीस निरिक्षक शरद सुभाष मरे यांना परभणी जिल्ह्यात पाठविले आहे. कालावधी पुर्ण न केलेल्या पोलीस निरिक्षकांच्या यादीत नांदेड येथील रमेश चिमाजी वाघ यांना मुंबई शहरात पाठविले आहे. जाफर नासर बेग मोगल यांना पोलीस प्रशिक्षण केंद्र सोलापूर येथे पाठविले आहे.शरद दामोधर जऱ्हाड यांना पोलीस प्रशिक्षण केंद्र जालना येथे पाठविले आहे.
नांदेड जिल्ह्यात कालावधी पुर्ण न झालेल्या यादीत येणारे पोलीस निरिक्षक विनोद मनोहर मेत्रेवार दहशतवाद विरोधी पथकातून नांदेडला येणार आहेत. नागरी हक्क संरक्षण विभागातून भुजंग विठ्ठलराव गोडबोले नांदेडला येणार आहेत. विशेष सुरक्षा विभागातील अनंत ज्ञानदेव भंडे यांना नांदेडला पाठविले आहे. कालावधी पुर्ण झालेल्या यादीत नांदेडला येणारे पोलीस निरिक्षक गुन्हे अन्वेषण विभागातून मिना बळीराम तोडेवाड यांना बॉम्ब शोधक व नाशक पथक नांदेड येथे नियुक्ती दिली आहे. दहशतवाद विरोधी पथकातील संजय सुभाष शिंदे यांना नांदेडला पाठविले आहे, विशेष सुरक्षा विभागातील अजित पोपट कुंभार यांना नांदेडला पाठविले आहे. जिल्हा जात प्रमाणपत्र तपासणी समिती हिंगोली येथील धिरज दत्तात्रय चव्हाण यांना नांदेडला पाठविले आहे.
या 379 बदल्यांमध्ये नांदेड पोलीस परिक्षेत्रातून जाणारे आणि येणारे पोलीस निरिक्षक पुढील प्रमाणे आहेत. बाळासाहेब नारायण पवार-धाराशिव(परभणी), वसंत देवराव चव्हाण-परभणी (नागपूर शहर), अशोक ययातीराव घोरबांड-परभणी (पोलीस प्रशिक्षण केंद्र लातूर), विवेकानंद बलभिम पाटील-पोलीस प्रशिक्षण केंद्र लातूर (परभणी), महादेव बब्रुवान गोमारे-पोलीस प्रशिक्षण केंद्र लातूर (छत्रपती संभाजीनगर ग्रामीण), प्रज्ञा जयसिंग खोद्रे(प्रज्ञा राजेंद्र चव्हाण)-पोलीस प्रशिक्षण केंद्र लातूर(मुदतवाढ) सुधीर दत्तात्रय सुर्यवंशी-जिल्हा जात प्रमाणपत्र तपासणी समिती धाराशिव(लातूर), शांतीकुमार रावसो पाटील यांना तदर्थ पदोन्नती देवून यवतमाळ येथून पोलीस प्रशिक्षण केंद्र लातूर येथे पाठविले आहे. मनोहर पंढरीनाथ इडेकर-पुणे शहर (परभणी), करण गुणाजी सोनकवडे-लातूर(मुंबई शहर), जगदीश शिवाजी मंडलवार-बुलढाणा(परभणी), शालीनी देवराव नाईक-जालना(हिंगोली), नितीन भानुदास इंद्राळे-विशेष सुरक्षा विभाग (पोलीस प्रशिक्षण केंद्र लातूर), श्रीकांत व्यंकटराव डोंगरे-मुंबई शहर(परभणी), संतोष अशोक पाटील-नागपुर शहर(लातूर).
या सर्व 379 बदल्यांमध्ये सर्वात महत्वपुर्ण जबाबदारी अनेक जिल्ह्यांमध्ये नाव गाजवून सध्या स्थानिक गुन्हा शाखा परभणी येथे कार्यरत असलेले पोलीस निरिक्षक अशोक ययातीराव घोरबांड यांच्यावर देण्यात आली आहे. या जबाबदारी प्रमाणे त्यांना पोलीस प्रशिक्षण केंद्र लातूर येथे नियुक्ती देण्यात आली आहे. त्या ठिकाणी प्रशिक्षणासाठी येणारे नवीन पोलीस प्रशिक्षणार्थी अर्थात भविष्यातील महिला व पुरूष पोलीस तयार करण्याची जबाबदारी त्यांच्यावर देण्यात आली आहे. नांदेड जिल्ह्यात आपला कार्यकाळ पुर्ण केल्यानंतर योगेश्र्वरांनी त्यांच्यावर निवडणुकीच्या संदर्भाने मोठी जबाबदारी दिली होती. परंतू खटाटोप करून त्यांनी आपली बदली परभणी जिल्ह्यात करून घेतली आणि तेथे स्थानिक गुन्हा शाखेच्या खुर्चीवर विराजमान झाले. पोलीस महासंचालकांनी दिलेली नुतन जबाबदारी अत्यंत महत्वपुर्ण आहे.
या बातमीसोबत पोलीस महासंचालक कार्यालयाने जारी केलेल्या कार्यकाळ पुर्ण करणाऱ्या पोलीस निरिक्षकांच्या बदल्या आणि कार्यकाळ न पुर्ण करणाऱ्या पोलीस निरिक्षकांच्या बदल्यांच्या दोन्ही पीडीएफ संचिका बातमीसोबत वाचकांसाठी जोडल्या आहेत.
Vihit Kalavadhi Purn N Zalelya PI Chya Badlya
Vihit Kalvadhi Purn Zalele PI Badlya