जनतेनी निवडणुक हातात घेतली होती-रावसाहेब दानवे

नांदेड(प्रतिनिधी)-भारतीय जनता पार्टीला राज्यात अपेक्षेप्रमाणे यश मिळायला पाहिजे होत. पण ते मिळाल नाही मात्र जनतेने आम्हाला चांगला कौल दिला. यामुळे तिसऱ्यांदा देशाचे पंतप्रधान म्हणून पंडीत जवाहरलाल नेहरुंच्यानंतर नरेंद्र मोदी यांनी शपथ घेतली. आगामी विधानसभा निवडणुकीच्या कामाला लागण्यासाठी कार्यकर्त्यांना सांगण्यासाठी मराठवाडा दौरा सुरू केला असल्याचे मत माजी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
लोकसभा निवडणुकीच्या पराभवानंतर होवू घातलेल्या राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या तयारीच्या अनुशंगाने मराठवाडा दौरा सुरू केला आहे. या दौऱ्याची सुरुवात जालना जिल्ह्यातून झाली असून आज मी नांदेडमध्ये आलो. यानंतर लातूर, धाराशिव, बीड, छत्रपती संभाजीनगर आणि हिंगोली, परभणी करून हा दौरा पुर्ण होणार आहे. जनतेने ही निवडणुक हातात घेतली होती. त्यामुळे जनतेने दिलेला जनादेश आम्हाला मान्य आहे. पराभव होण्यासाठी कोणतही एक कारण नसते. यासाठी अनेक कारणे असतात. राज्यात भारतीय जनता पार्टीला 2 कोटी 48 लाख मते पडले आहेत. तर महाविकास आघाडीला 2 कोटी 50 लाख एवढी मते पडली आहेत. या मतांमध्ये फारसा काही फरक नाही. त्यांच्या जागेतही फारसा काही फरक नाही. सर्व आकडे एकत्र करून ते आकडे फुगून सांगत आहेत. कॉंगे्रस भाजपाला बहुमत मिळाल नाही. म्हणून आनंद व्यक्त करत आहे. पण इंडिया आघाडीपेक्षाही जास्त खासदार भारतीय जनता पार्टीचे आहेत.
भाजपाची जादू देशात कमी झाली याबाबत विचारले असता ते म्हणाले की, जादू अजूनही कायम आहे. म्हणूनच मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान झाले. भारतीय जनता पार्टी कधीही हवेत नव्हती. ती जमीनीवरच पाय ठेवून काम करत असते. केवळ हवा बदलत असते. ओबीसी-मराठा आरक्षणाच्या बाबतीत बोलत असतांना ते म्हणाले की, लढण्याचा सर्वांना अधिकार आहे. दोन्ही समाजाने एकत्र येवून यात मार्ग काढणे गरजेचे आहे. कोणत्याही समाजात वाद लावण्याची सरकारची भुमिका नाही असेही ते म्हणाले. रावसाहेब दानवे यांनी पदाधिकाऱ्यांची व कार्यकर्त्यांची आढावा बैठक शासकीय विश्रामगृह येथे घेतले. या पत्रकार परिषदेला माजी खा.प्रताप पाटील चिखलीकर, आ.भिमराव केराम, जिल्हाध्यक्ष डॉ.संतुक हंबर्डे, महानगराध्यक्षा दिलीप कंदकुर्ते, माजी आ.गोविंद केंद्रे, सचिव देविदास राठोड यांच्यासह आदींची यावेळी उपस्थिती होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *