चार चाकी गाडीचे दार उघडले; स्कुटी चालक धडकला; पुन्हा टिपरने धडक दिली, एकाचा मृत्यू

नांदेड(प्रतिनिधी)-वाहन चालकांना आपल्या जबाबदारीची जाणिव नसल्यामुळे आज एका दुचाकी स्वाराला आपला जिव गमवावा लागला. असाच प्रकार आयटीआय जवळील गोदावरी बेकरी समोर सुध्दा कधी घडेल याचा नेम नाही.
आज दुपारी 12-1 वाजेदरम्यान आनंदनगर चौकात एक कार उभी होती. त्या कारच्या चालकाने मागे काय आहे हे न पाहता आपला दरवाजा उघडला. त्या दरवाज्याला अडकून एक स्कुटी चालक खाली पडला. मागून येणाऱ्या टिपर क्रमांक एम.एच.04 पीएल 8835 ने त्या स्कुटी चालकाला पुन्हा धडक दिली आणि त्याचा जिव गेला. जिव गेलेल्या स्कुटी चालकाचे नाव विजयकांतराव रामतिर्थकर (45) रा.हर्षनगर नांदेड असे आहे.चार चाकी गाडी चालवतांना विशेषता: त्यातून खाली उतरतांना उजवीकडील दरवाजे उघडतांना विशेष लक्ष ठेवण्याची गरज आहे.आपण दरवाजा उघडता हे मागून येणाऱ्या गाडी चालकांना माहित नसते. त्यामुळे गाडीमधील माणसानेच उजव्या बाजूने उतरतांना स्वत:च मागच्या बाजूचा अंदाज घेवून नंतरच दार उघडायला हवे असा मोटार वाहन कायद्यातील नियम सुध्दा आहे. पण नियमांकडे दुर्लक्ष करणे हेच आपले शौर्य असल्यामुळे कोणीच तसे करत नाही. इतर कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे.

गोदावरी बेकरी आयटीआय या ठिकाणी सुध्दा नेहमी होणारी गर्दी अत्यंत महत्वपुर्ण आहे. या ठिकाणी सुध्दा वाहन चालक इतरांना अडचण होईल याची कोणतीही परवा न करता गाड्या तळ करतात आणि बेकरीत जातात. तसेच या ठिकाणी होणारी वाहतुकीची नेहमीची कोंडी अत्यंत महत्वपुर्ण आहे.या ठिकाणी काही गडबड झाल्यास पोलीसांनी हस्तक्षेप केला तर गाड्या व्हीआयपी लोकांच्या असतात ते पोलीसांना तु मला सांगणारा कोण असे विचारतात. मग कायदा व्हीआयपी लोकांसाठी नाही काय? असा प्रश्न सुध्दा मोठा आहे. भविष्यात गोदावरी बेकरी जवळ आज आनंदनगर चौकात घडलेला प्रकार घडणार नाही याची कोणतीही शाश्वती नाही. गोदावरी बेकरीच्यावतीने सुध्दा आपल्याकडे येणाऱ्या वाहनांना वाहनतळ उपलब्ध करून देणे आवश्यक आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *