कौठा दरोड्याचा तपास जलद गतीने करा- मागणी

 

कंधार,(प्रतिनिधी)- तालुक्यातील कौठा येथील गजानन श्रीहरी येरावार यांच्या घरी पडलेल्या सशस्त्र दरोड्याचागतीने तपास करून आरोपींना लवकरात लवकर अटक करावी या मागणीसाठी “महाराष्ट्र आर्य वैश्य महासभा नांदेड महानगर तर्फे आज दिनांक 18 जून रोजी सकाळी 11 वाजता पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांना निवेदन देण्यात आले.

याप्रसंगी दिलीपभाऊ कंदकुर्ते,एकनाथ मामडे,लक्ष्मीकांत मुक्कावार,दत्तात्रय पारसेवार,बालाजी येरावार,अरुण चालिकवार,सचिन काशेटवार,रितेश भास्करवार,सुरेश निलावार,संजय गंधेवार,राम येरमवार,प्रदीप मनाठकर,दत्तात्रय पईतवार,योगेश बारडकर,दिलीप दमकोंडवार,गजानन उत्तरवार,सागर पेकम,अंबादास कवटीकवार आदींची उपस्थिती होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *