वंचितकडून नांदेड उत्तरसाठी प्रा.राजू सोनसळे यांची तयारी

 

नांदेड(प्रतिनिधी)-लोकसभा निवडणुकीत भाजपाची हार झाल्यानंतर विधानसभा निवडणुकीच्या तयारीला सर्वच पक्षांनी कंबर बांधली आहे. जर लोकसभेत भाजपाचा विजय झाला असता तर विधानसभा निवडणुकीचे एक हाती वारे फिरले असते. भाजपाचा पराभव झाल्यामुळे लोकशाही कुठे तरी जिवंत आहे असा आवाज आता निघतांना दिसून येते. नांदेड उत्तर विधानसभेसाठी अन्य पक्षांच्या तयारी बरोबरच वंचित बहुजन आघाडीनेही विधानसभे जोरदार तयारी सुरू केली असून यासाठी सर्व समावेश उच्च शिक्षीत असणाऱ्या प्रा.राजू सोनसळे यांनी मतदारांचा कौल बघुन निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची तयारी सुरू केली आहे.

लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीचे ऍड.अविनाश भोसीकर हे उमेदवार होते. यांना नांदेड उत्तरमधून 24 हजार 500 मतदान मिळाले आहे. तर 2019 च्या लोकसभा निवडणुकीत प्रा.यशपाल भिंगे यांनी 38 हजार मतदान घेतले होते. तर 2019 च्या विधानसभा निवडणुकीत नांदेड उत्तर मधून नवखा चेहरा असणाऱ्या मुकूंद चावरे यांना 26 हजार मते मिळाली होती. विशेषत: हा उमेदवार शेवटपर्यंत कोण आहे हे देखिल मतदारांना माहित झाले नव्हते तरी देखील 26 हजार मते या उमेदवाराला प्राप्त झाली होती. प्रा.राजू सोनसळे यांना जर ांदेड उत्तरची उमेदवारी मिळाली तर सर्वसामावेश चेहरा म्हणून सर्व जाती धर्मात ओळख असणारा तरुण चेहरा म्हणून ते परिचयाचे आहेत. प्रा.सोनसळे यांची पार्श्र्वभूमी ही विद्यार्थी दशेपासून अनेकांना ओळख निर्माण झाली आहे. विद्यार्थ्यांच्या हितासाठी त्यांनी विद्यार्थी संघटनेच्या माध्यमातून अनेक आंदोलने, चर्चा सत्रे, मोर्चा अशा अनेक माध्यमांतून त्यांनी काम केल आहे.

विशेषत: बौध्द समाजातही प्रा.सोनसळे यांची स्वच्छ प्रतिमा आहे. 2024 मध्ये पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी ऍड.अविनाश भोसीकर या उमेदवाराचा प्रचार गल्लीबोळांपर्यंत जावून केला. वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ऍड. प्रकाश आंबेडकर यांच्या जाहीर सभेपासून ते गल्लीतील कॉर्नर बैठकापर्यंत यांनी मतदारपर्यंत जाण्याच काम केल. यामुळे प्रा.सोनसळे हे सर्व समावेश उच्च शिक्षीत व तरुण चेहरा म्हणून नक्कीच मतदारांना प्रभावीपणे ठरेल. या भागातील मतदारांनीही आगामी विधानसभा निवडणुकीसाठी प्रा.सोनसळे यांना उमेदवारी दिली तर निश्चितच विजयाच्या वाटेवर वाटचाल करतील अशी भावनाही समाजातील अनेक मतदारांनी व्यक्त केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!