नीटच्या विरोधात नांदेड विद्यार्थ्यांचा एल्गार मोर्चा; हजारो विद्यार्थी उतरले रस्त्यावर

नांदेड(प्रतिनिधी)-शैक्षणिक क्षेत्रातील सर्वोच्च समजल्या जाणाऱ्या निट परिक्षेत मोठ्या प्रमाणता भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करत निट परिक्षा रद्द करून पुन्हा घेण्यात याव्यात या मागणीसाठी नांदेड शहरात दि.14 रोज शुक्रवारी भाग्यनगर येथून हजारो विद्यार्थ्यांनी एल्गार मोर्चाच्या माध्यमातून जिल्हाधिकाऱ्यांमार्फत शासनाला निवेदन सादर केले.
नीट परिक्षेसाठी देशभरातून 24 ते 25 लाख विद्यार्थी या परिक्षेला सामोरे जातात. या परिक्षेची तयारी विद्यार्थी 2 वर्षापासून करतो. अनेक पालक आपल्या मुलांनाा डॉक्टर करण्यासाठी आपली जमा असलेली तुटपुंजी यामध्ये समर्पित करतो आणि केंद्र सरकारकडून जर एखाद्या संस्थेला गुत्ते देऊन मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होत असेल तर या परिक्षा घ्यायच्याच कशाला. ग्रेसच्या नावाखाली पैकीच्या पैकी मार्क देवून देशातील 67 विद्यार्थी 720 पैकी 720 गुण घेवून उत्तीर्ण होतात. हा ईतिहास मात्र पहिल्यांदाच घडला. यात मोठा भ्रष्टाचार असल्याचा आरोप करण्यात आला. ही परिक्षा रद्द करण्यात यावी. पुन्हा नव्याने परिक्षा घ्यावी. केंद्र सरकारने या बाबतीत एसआयटी गठीत करून झालेल्या भ्रष्टाचाराची सखोल चौकशी करावी आणि यातील दोषींविरुध्द कठोर कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी आज काढण्यात आलेल्या एल्गार मोर्चातून करण्यात आली. हा मोर्चा भाग्यनगर येथून काढण्यात आला. आयटीआय येथील महात्मा फुले पुतळ्यासमोरया मोर्चाचा समारोप करण्यात आला आणि काही शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांमार्फत शासनाकडे निवेदन सादर केले. या मोर्चात हजारो विद्यार्थी रस्त्यावर उतरून नीट आणि शासनाच्या विरोधात घोषणा बाजी देत होते.
या मोर्चात युवक कॉंगे्रसचे बालाजी गाडे, पीटीए संघटनेचे राज्य अध्यक्ष प्रा.आर.बी. जाधव, पीटीए संघटनेचे जिल्हाध्यक्ष राज अटाकोरे, सीसीटीएफ संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रा.डॉ.नागेश कल्याणकर, उपाध्यक्ष साईकिरण सलगरे, आयआयबीचे बालाजी पाटील, केदार पाटील सोळुंके, अब्दुल बाखी, विश्र्वास कदम यांच्या निवेदनावर स्वाक्षऱ्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *