नांदेड(प्रतिनिधी)-लोकसभा निवडणुकीमुळे महामार्ग सुरक्षा पथकात बदली झालेल्या कर्मचाऱ्यांना त्यांच्या नियुक्तीच्या ठिकाणी सोडण्यात आले नव्हते. पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी नांदेड जिल्ह्यातून महामार्ग सुरक्षा पथक छत्रपती संभाजीनगर परिक्षेत्र येथे हजर होण्या करीता 25 पोलीसांना कार्यमुक्त करण्याचे आदेश जारी केले आहेत.
नांदेड जिल्ह्यातून महामार्ग सुरक्षा पथक छत्रपती संभाजीनगर येथे बदली झालेले आणि त्यांना कार्यमुक्त करण्यात आले आहे असे पोलीस अंमलदार पुढील प्रमाणे आहेत. त्यांची नेमणुक कंसात लिहिली आहे. धनराज माधवराव पुरी, शंकर नामदेव जाधव, शैलेशकुमार रघुनाथराव सिरसे (बीडीडीएस), राम प्रकाश वडजे, अंगद सुर्यकांत राऊत(वजिराबाद), शेख नजीर शेख मदार (कुंडलवाडी), अनिलकुमार बसवंत सिधापुरे(नायगाव), शेख रियाज शेख रजाक, राहुल भगवान तारु, बालाजी नामदेव केंद्रे, शिवकुमार नागोराव पांडे, विरेंद्र दिगांबर पवार, गजानन उत्तमराव इंगळे, दिपक लक्ष्मण लिंगायत( पोलीस मुख्यालय), दिलीप शंकर राठोड(इवारा), सुशिल गोपीचंद राठोड(माहुर), कुणाल गौतम नरवाडे(आरसीपी), सिध्देश्र्वर बालाजी कागणे(किनवट), मेघराज राम पुरी (क्युआरटी), अशोक दिगंबर मस्के(एटीसी), अब्दुल वजिद अब्दुल वाहिद(बिलोली), राहुल शंकर वाघमारे(किनवट), शाहाजी शिवाजी जोगदंड (तामसा), गोविंद दत्तात्रय बेजरपे(नियंत्रण कक्ष), सतिश शिवराम गुरूतवाड असे आहेत.